भारत-इंग्लंड (India vs England) संघात आगामी 5 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. इंग्लंड संघाचा भारत दौरा (22 जानेवारी) पासून सुरू होणार आहे. तर (12 फेब्रुवारी) रोजी संपेल. टी20 मालिकेत भारतीय संघाची धुरा ‘सूर्यकुमार यादव’कडे (Suryakumar Yadav) असण्याची पूर्ण शक्यता आहे.
या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. पण संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंना संधी मिळण्याची पूर्ण आशा आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण त्या 3 प्रमुख भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊया, जे पहिल्यांदाच इंग्लंडविरूद्ध टी20 सामना खेळणार आहेत.
1) संजू सॅमसन- भारताचा दिग्गज फलंदाज ‘संजू सॅमसन’लाही (Sanju Samson) अद्याप इंग्लंडविरूद्ध टी20 सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. सॅमसन या फॉरमॅटमध्ये 9 संघांविरूद्ध खेळला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. सॅमसनने आतापर्यंत खेळलेल्या 37 सामन्यांमध्ये 27.93च्या सरासरीने 810 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 3 शतकांसह 2 शतके झळकावली आहेत.
2) तिलक वर्मा- या यादीत ‘तिलक वर्मा’च्या (Tilak Verma) नावाचाही समावेश आहे. तिलकचे टी20 पदार्पणही रिंकूसोबत झाले. या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत 7 संघांविरूद्ध टी20 सामने खेळले असून त्यात इंग्लंडचे नाव नाही. तिलकने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 20 सामन्यांमध्ये 51.33च्या सरासरीने 616 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतकांसह 2 अर्धशतके झळकावली आहेत.
3) रिंकू सिंह- विस्फोटक फलंदाज ‘रिंकू सिंह’ने (Rinku Singh) ऑगस्ट 2023 मध्ये आयर्लंडविरूद्ध टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 30 टी20 सामने खेळले आहेत, परंतु त्याला इंग्लंडविरूद्ध एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आगामी मालिकेतील ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा रिंकू संघाविरूद्ध टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
भारत-इंग्लंड संघातील 5 टी20 सामन्यांचे वेळापत्रक-
पहिला टी20 सामना- 22 जानेवारी, ईडन गार्डन्स, कोलकाता
दुसरा टी20 सामना 25 जानेवारी, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
तिसरा टी20 सामना 28 जानेवारी, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट
चौथा टी20 सामना 31 जानेवारी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पाचवा टी20 सामना 2 फेब्रुवारी, वानखेडे स्टेडियम, मुंबई
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-विराट अजून किती दिवस खेळणार? माजी दिग्गजाची प्रतिक्रिया
WPL 2025; कधी आणि कुठे होणार महिला प्रीमियर लीगचे सामने?
मोहम्मद शमीच्या दुखापतीचे कारण काय? माजी दिग्गजांनी उपस्थित केले प्रश्न