---Advertisement---

या भारतीय क्रिकेटरचा फोटो पाहुन तुम्हालाही होईल बजरंग बलीची आठवण

On: रविवार, जून 7, 2020 7:31 PM
---Advertisement---

लॉकडाऊन जवळ जवळ आता संपत आलं असून त्याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. अशा परिस्थितीत सेलिब्रिटींनीही घराबाहेर जाणे सुरू केले आहे. बर्‍याच दिवसानंतर घराबाहेर पडलेला भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसनने आपल्या इंस्टाग्रामवर यावेळीचा असा फोटो शेअर केला आहे, की तो पाहून तुमच्या मनातही धार्मिक भावना निर्माण होईल आणि रामायणाची आठवण येईल. यानंतर आपणही नक्कीच म्हणाल, “जय श्री राम.”

भारतीय संघात आत बाहेर होत असलेला यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनने (Sanju Samson) समुद्राच्या कडेचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात विशेष इफेक्टच्या मदतीने त्याने स्वत: ला सुपरमॅन सारखं हवेत उडताना दाखवलं आहे. त्याने त्या फोटोला “अगला स्टॉप लंका” असा मथळा  दिला आहे. त्यामुळे नक्कीच रामायणाची आठवण येते. बजरंगबली हनुमानानेसुद्धा सीतेच्या शोधात लंकेला जाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरून अशीच उड्डाण घेतल्याची अख्यायिका आहे.

संजू बीचवर जोरदारपणे व्यायाम करत आहे. २५ वर्षांचा सॅमसन केरळचा राहणारा आहे. जिथं समुद्रकिनारा लाभलेला आहे. फिटनेससाठी समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळू खूप महत्वाची असते. ज्यामध्ये धावण्यामुळे सामर्थ्य वाढविले जाते. संजूदेखील याचा पुरेपूर फायदा घेत आहे. लॉकडाऊन दरम्यानच्या तंदुरुस्तीवर होणारा परिणाम काढून, पुढील हंगामासाठी स्वत:ला जोरदार तयार करण्याकडे त्यांचं लक्ष आहे

एमएस धोनी (MS Dhoni) टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेणार हे आता निश्चित मानलं जातं आहे. त्याच्या जागी रिषभ पंत (Rishabh Pant) पूर्णपणे आपली जागा बनवू शकला नाही. तर निवडकर्ते वृद्धिमान साहावर (Wriddhiman Saha) विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत संजूचे लक्ष नव्या हंगामात टीम इंडियामध्ये परतण्यावर आणि कायमचे स्थान मिळवण्यावर आहे.

https://www.instagram.com/p/CBBUvvZFXPk/?utm_source=ig_web_copy_link

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत संजूने ४ टी२० सामने खेळून केवळ ३५ धावा केल्या आहेत. परंतु प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचा विक्रम उत्कृष्ट आहे. त्याने देशांतर्गत अ दर्जाच्या सामन्यात २१२ धावांचीही खेळी केली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-तुम्ही राहुल द्रविडला युवराज सिंग करु शकत नाही!

-‘वाह भाई घर हो तो ऐसा’, पहा ५ भारतीय क्रिकेटर्सची आलिशान घरं

-तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटला रहावे लागणार ७ दिवस आयसोलेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---