Ranji Trophy 2024: संजू सॅमसन (Sanju Samson) सध्या रणजी ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे. केरळ विरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यानंतर संजू सॅमसनने अनेकांची मन जिंकली आहे. त्याचा व्हिडीओ राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ‘एक्स’ (X) वर पब्लिश केला आहे. ज्यामध्ये तो एका अपंग चाहत्याला आपली राजस्थान रॉयल्सची कॅप भेट देताना दिसून येतोय.
Sanju Samson Video: भारतीय टीमचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) अनेकवेळा चाहत्याची मने जिंकताना दिसून येतो. अशातच रणजी ट्रॉफी खेळताना एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होताना समोर आला आहे. त्यात तो चाहत्यांना ऑटोग्राफ, त्यांच्या सोबत सेल्फी घेताना दिसून येतोय.
Heart is full. 💗 pic.twitter.com/DqWnb6Bm7U
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 10, 2024
संजू सॅमसन रणजी ट्रॉफीमध्ये निराशाजनक प्रदर्शन
उत्तर प्रदेश संघाने पहिल्या डावात 302 धावा तर दुसऱ्या डावात 323 धावा काढल्या. प्रतिउत्तरादाखल केरळ संघ पहिल्या डावात 243 धावांवर सर्व बाद झाला आणि दुसऱ्या डावात सामना थांबला तेव्हा केरळ 72/2 अशा स्थितीत होता. या सामन्यात सर्वाधिक 92 धावा उत्तर प्रदेशकडून रिंकू सिंगने केल्या तर केरळ संघाकडून विष्णू विनोदने 74 धावा काढल्या. केरळ संघाचा कर्णधार संजू सॅमसनने 35 धावा केल्या.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND VS AFG)
भारतात होणाऱ्या 11 जानेवारीला अफगाणिस्तान विरुद्ध टी20 मालिकेसाठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारतीय संघात स्थान दिले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
हेही वाचा
‘सर्व बातम्या खोट्या…’, पत्रिकार परिषदेत द्रविडकडून ईशन आणि अय्यरची पाठराखण! चर्चेला पूर्णविराम
मोठी बातमी! दिल्ली कॅपिटल्सच खेळाडू बलात्काराच्या आरोपात दोषी, न्यायलायाकडून आठ वर्षांची कोठडी