भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला टी20 सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा (Sanju Samson) फ्लॉप शो सुरूच आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात सॅमसनला मोठी खेळी करून पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी होती, मात्र या सामन्यात त्याने केवळ 10 धावांची खेळी खेळून तंबूत परतला. त्याच्या या खराब खेळीमुळे चाहते त्याच्यावर नाराज होताना दिसत आहेत.
यशस्वी जयस्वाल (Yashasvi jaiswal), शुबमन गिलच्या (Shubman Gill) अनुपस्थितीत सॅमसनकडे बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत सलामीची जबाबदारी देण्यात आली होती. मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात सॅमसनने 19 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या टी20 सामन्यातही केवळ 7 चेंडूंचा सामना करून 10 धावा केल्या. त्याच्या फ्लॉप शोमुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
Really disappointed with Sanju Samson. He had a great opportunity to prove himself and secure his spot in the team. He started well in the last game, but he failed again today. He needs to realize that consistent performances are what will compel the management to keep him in the… pic.twitter.com/0TfBQPFPI8
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) October 9, 2024
Sanju Samson Contract With JUSTICE Is Officially Came To An End After Partnership Of 12 Years.
END OF AN ERA. 💔 pic.twitter.com/IG9EDzYsJA
— Rishabhians Planet (@Rishabhians17) October 9, 2024
संजू सॅमसनच्या (Sanju Samson) टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 2015 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 31 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 27 डावात फलंदाजी करताना 19.70च्या सरासरीने 473 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 132.49 राहिला आहे. टी20 मध्ये त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफी? आयसीसीचा नवा प्लॅन जाणून घ्या
टीम इंडियाबाहेर असलेल्या इशान किशनचं नशीब जोरात, या संघाचं कर्णधारपद मिळालं
4 कसोटी 4 शतकं, डॉन ब्रॅडमनपेक्षा कमी नाही हा क्रिकेटपटू! कसोटीत करतो वनडे स्टाईल फलंदाजी