भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने दमदार खेळी केली. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. या पुरस्कारासह संजू महेंद्रसिंग धोनीशी संबंधित एका खास यादीत सामील झाला. परदेशी भूमीवर ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारा तो पाचवा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.
परदेशी भूमीवर ‘मॅन ऑफ द मॅच’ मिळवणारा सॅमसन हा पाचवा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे. या बाबतीत धोनी आघाडीवर आहे. महेंद्रसिंग धोनीला हा पुरस्कार ५ वेळा मिळाला आहे. तर रिषभ पंत, राहुल द्रविड आणि फारूक इंजिनियर यांना प्रत्येकी एकदा हा पुरस्कार मिळाला आहे. आता या यादीत सॅमसनचाही समावेश झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘…पाकिस्तानने ५० षटके घेतली असती’, भारतावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानी दिग्गजाचाच टोला
‘मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतोय!’ मोहम्मद सिराजने गायले कर्णधार राहुलचे गोडवे