भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या भारत-अ आणि न्यूझीलंड-अ यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. बुधवारपासून (28 सप्टेंबर) भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. उभय संघांमध्ये प्रथम टी20 सामने होणार आहेत. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. 28 सप्टेंबर रोजी वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली जाऊ शकते. या मालिकेसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन याला कर्णधार तर, संजू सॅमसन याला उपकर्णधार बनविले जाण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नाही. यानंतर अनेक तज्ञांनी संघनिवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संजू सॅमसनला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. 27 वर्षीय सॅमसनची लिस्ट-ए क्रिकेटमधील कामगिरी उत्कृष्ट अशी म्हणता येईल. त्याने आतापर्यंत 103 डावात 31 च्या सरासरीने 2806 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे एक शतक आणि 15 अर्धशतके जमा असून, नाबाद 212 धावांची सर्वोत्तम खेळी होती. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी 6 वनडे सामन्यांच्या 6 डावांमध्ये 44 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. यात एका अर्थशतकाचाही समावेश आहे. न्यूझीलंड अ विरुद्धच्या मालिकेत देखील तो सर्वाधिक धावा बनवणारा भारतीय फलंदाज ठरला.
मागील सहा महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये असलेल्या मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारलाही वनडे संघात संधी मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर मध्य प्रदेशला रणजी ट्रॉफीमध्ये विजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुलीप ट्रॉफीमध्येही त्याने अप्रतिम कामगिरी केली. त्याने लिस्ट ए च्या 44 डावांमध्ये 35 च्या सरासरीने 1462 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतके आणि 5 अर्धशतके ठोकलीत. रजत प्रमाणेच वनडे संघात शुबमन गिल, उमरान मलिक आणि राहुल त्रिपाठी यांनाही वनडे संघात संधी मिळू शकते. गिल सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप खेळत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड ए विरुद्ध संजू सॅमसनची ‘कॅप्टन्स इनिंग’;तिलक, शार्दुलचीही चमकदार फलंदाजी
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज