---Advertisement---

Ind vs SA: संजू सॅमसनला संधी मिळणार! दुसऱ्या टी20 सामन्यासाठी कशी असणार भारताची प्लेइंग इलेवन?

On: गुरूवार, डिसेंबर 11, 2025 5:16 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना कटकमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने एकतर्फी विजयाची नोंद केली. तर मालिकेतील दुसरा सामना आज (11 डिसेंबर) चंदिगडमधील मुल्लानपूर येथे खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाकडे 2-0 ने विजयी आघाडी घेण्याची संधी असणार आहे. गेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेवनमध्ये बदल होणार का? जाणून घेऊया.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. ज्या प्लेईंग इलेवन सह भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे, त्यात बदल होणं जरा कठीण आहे. त्यामुळे या सामन्यातही संजू सॅमसनला विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. जर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार असेल, तर शिवम दुबेला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी कुलदीप यादवचा प्लेईंग इलेवन मध्ये समावेश केला जाऊ शकतो. असं झाल्यास अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीला कुलदीप यादवच्या फिरकीची साथ मिळू शकते.

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. पण हार्दिक पांड्याने शेवटी तुफान फटकेबाजी करून अर्धशतकी खेळी केली आणि संघाची धावसंख्या 175 धावांवर पोहोचवली होती. त्यानंतर गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेचा डाव स्वस्तात संपुष्टात आणला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---