---Advertisement---

मन जिंकलस! कँसर पिडीत चिमुकल्याची मागणी केली झटक्यात पूर्ण, त्याक्षणी संजू झाला इमोशनल

Sanju-Samson-Zimbabwe-Kid
---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हा क्रिकेटच्या मैदानावरील त्याच्या प्रदर्शनाने मने तर जिंकतोच. परंतु बऱ्याचदा त्याला त्याच्या मैदानाबाहेरील कृतीनेही मने जिंकताना पाहिले गेले आहे. झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात शनिवारी (२० ऑगस्ट) हरारे येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतरही त्याने आपल्या कृतीने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची हृदय जिंकली आहेत.

संजूने (Sanju Samson) झिम्बाब्वेच्या एका कँसरशी झुंज (Zimbabwe Cancer Fighting Kid) देत असलेल्या चिमुकल्याला प्रेमळ वागणूक दिली आहे. या मन जिंकणाऱ्या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत अनेकांनी संजूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धचा दुसरा वनडे सामना झिम्बाब्वेतील कँसरग्रस्त मुलांना समर्पित केला. या चांगल्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दर्शकांना केशरी रंगाची जर्सी घालून सामना पाहायला येण्याचे आवाहनही बोर्डाने केले होते. देशातील आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही सामाजिक भान जपत झिम्बाब्वे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचे तेथील रहिवास्यांनी स्वागत केले. बरेचसे कँसरग्रस्त चिमुकले आणि त्यांचे कुटुंबिय केशरी रंगाचे कपडे घालून हा सामना पाहायला आले होते.

यापैकीच एक चिमुकला संजूच्या खेळीने प्रभावित झाला. सामना संपल्यानंतर त्या चिमुकल्याने संजूकडे धाव घेतली आणि आपल्याकडे असलेल्या चेंडूवर संजूला ऑटोग्राफ देण्याती विनवणी केली. मोठ्या मनाच्या संजूनेही त्याला लगेचच ऑटोग्राफ दिला. यानंतर संजूने त्या चिमुकल्याशी काही वेळ गप्पाही मारल्या.

https://twitter.com/hritesharma/status/1560989388007346177?s=20&t=-MheSVQmC6fOppgjFMFZmw

कँसरविरुद्ध लढा देत असलेल्या झिम्बाब्वेच्या त्या चिमुकल्याला आपल्या ऑटोग्राफसाठी असे धावत येताना पाहून संजूचे डोळेही पाणावले. ‘त्याचे माझ्याकडे असे पळत येणे, हृदयाला स्पर्श करणारे होते’, अशी प्रतिक्रिया संजूने त्या मुलाला भेटल्यानंतर दिली.

दरम्यान झिम्बाब्वेच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संजूने मॅच विनिंग प्रदर्शन केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संजूने ३९ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. तसेच त्याने खणखणीत षटकार मारत संघाला सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. आता भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघातील शेवटचा सामना २२ ऑगस्टला होईल.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण

‘कोहलीच्या नेतृत्वामुळेच भारत सध्या कसोटी क्रिकेटमध्ये…’, माजी दिग्गजाने केला दावा

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 474 खेळाडू सहभागी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---