वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडा येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीलाच अडचणीत सापडला. या मालिकेपूर्वी चर्चा झालेल्या संजू सॅमसन याला सलग तिसऱ्या सामन्यात आपला प्रभाव पाडता आला नाही.
फ्लोरिडा येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल 5, शुबमन गिल 9 व तिलक वर्मा 27 धाव करून बाद झाल्यानंतर संजू पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी असताना, तो 9 चेंडूंवर केवळ 13 धावा करून तंबूत परतला
संजू या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. पहिल्या सामन्यात त्याने 12 चेंडू मध्ये 12 तर दुसऱ्या सामन्यात 7 चेंडूमध्ये 7 धावा केलेल्या. तिसऱ्या व चौथ्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्याआधी वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मात्र त्याने आक्रमक फटकेबाज करताना अर्धशतक झळकावले होते. तर, दुसऱ्या सामन्यात तो 9 धावांवर बाद झालेला.
संजू याने भारतीय संघासाठी 2013 मध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला फारशी संधी मिळाली नाही. आगामी वनडे विश्वचषकासाठी त्याचा संघात समावेश करावा अशी मागणी अनेक दिग्गज करत आहेत. मात्र संजू याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने अनेक जण त्याच्यावर टीका देखील करतात. या दौऱ्यावरही तो फारसा प्रभावीत करू शकला नाही. त्यामुळे आगामी आशिया चषक व विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात संधी मिळते का हे पाहणे, औत्सुक्याचे ठरेल.
(Sanju Samson Yet Another Failure In West Indies Out On 13)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकासाठी वनडे निवृत्तीतून माघार घेणार बेन स्टोक्स? लवकरच होणार संघाची घोषणा
वाद मिटला! स्वतः विराट म्हणाला, ‘बाबर जगात एक नंबर फलंदाज’, पहिल्या भेटीविषयी केला खुलासा