इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए (INDAvNZA)यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि तिसरा वनडे सामना सुरू आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या या वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. या सामन्यात त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. भारताने या सामन्यात 49.3 षटकात सर्वबाद 284 धावासंख्या उभारली आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अभिमन्यू इश्वरण आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. मात्र अभिमन्यू 8 चौकाराच्या मदतीने 39 धावा करत बाद झाला. त्यानंतर लगेचच 10 धावांच्या अंतराच्या राहुल त्रिपाठी हा पण बाद झाला. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विकेटकीपर संजू सॅमसन (Sanju Samson) याने अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने 68 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने 2 षटकार आणि 1 चौकार मारला. तो सध्या या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने या मालिकेत नाबाद 29 आणि 37 अशा धावा केल्या आहेत.
संजूने तिलक वर्मा याच्यासोबत उत्तम फटकेबाजी करताना भारताचा धावफलक हलता ठेवला. भारताची धावसंख्या 164 अशी असताना वर्माने त्याची विकेट गमावली. त्याने 3 षटकार आणि एक चौकार खेचत 50 धावा केल्या. त्यानंतर विकेटकीपर श्रीकर भारत, सॅमसन आणि राज बावा यांच्या विकेट्स पडल्याने शार्दुल ठाकुर आणि रिषी धवन यांनी इंडिया एचा डाव सांभाळला. ठाकुरने अर्धशतक केले तर धवन 34 धावा करत रनआऊट झाला. ठाकुरने 4 चौकार आणि 3 षटकाराच्या साहाय्याने 33 चेडूंत 51 धावा केल्या.
इंडिया ए संघाने पहिले दोन सामने जिंकले असून मालिका आधीच नावावर केली आहे. त्याआधी भारताने कसोटी मालिकाही खिशात टाकली आहे. वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकुर, कुलदीप सेन आणि कुलदीप यादव यांनी उत्तम कामगिरी केली आहे. यात सातत्य राखत मालिका 3-0ने जिंकण्याचा इंडिया एचा प्रयत्न असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
श्रेयस करणार टीम इंडियात कमबॅक? प्रमुख अष्टपैलू झाला दुखापतग्रस्त
राहुल द्रविड यांचे आयपीएलमध्ये पुनरागमन! सांभाळणार या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या