सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दरम्यान दोन्ही संघात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात स्टार खेळाडू संजू सॅमसनने (Sanju Samson) तुफानी अर्धशतक झळकावले आणि इतिहास रचला. संजूच्या या दमदार फलंदाजीदरम्यान त्याचे वडील विश्वनाथ सॅमसन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. खरेतर सॅमसनच्या वडिलांनी रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविडवर संजूचे करिअर खराब केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संजू सॅमसनचे (Sanju Samson) वडील विश्वनाथ यांनी नुकतीच एका मल्याळम मीडियाशी मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यानच त्यांनी धक्कादायक विधान केले. ते मुलाखतीत म्हणाले, “असे 3-4 खेळाडू आहेत, ज्यांनी माझ्या मुलाचे 10 वर्षांचे क्रिकेट करिअर उद्ध्वस्त केले. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याची कारकीर्द उद्ध्वस्त केली. त्यांनी माझ्या मुलाला जेवढे दुखावले, तेवढ्याच ताकदीने संजूने सर्व गोष्टींचा सामना केला आणि या संकटातून बाहेर पडला.”
गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) कौतुक करताना संजूचे वडील म्हणाले, “मला सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर भाई यांचे आभार मानायचे आहेत, मला खूप आनंद झाला आहे. हे 2 खेळाडू आले नसते तर संजूला पूर्वीप्रमाणे संघातून वगळले गेले असते. संजूला सचिन आणि द्रविडसारखा क्लासिकल टच आहे. किमान त्याचा आदर तरी करायला हवा.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA; 27 वर्षीय भारतीय खेळाडूने केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण…!
IPL Mega Auction 2025; मुंबईने सोडलेल्या ‘या’ 3 खेळाडूंना चेन्नई करणार टार्गेट?
“बंद करा भारतासोबत खेळणं…” माजी पाकिस्तानी दिग्गजाचे वादग्रस्त विधान