---Advertisement---

IND vs NZ: संजू सॅमसनचा ऐतिहासिक पराक्रम! दिग्गज खेळाडूंना मागे टाकत रचला नवा जागतिक विक्रम

On: रविवार, मार्च 8, 2026 10:04 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची (5 चौकार आणि 8 षटकार) वादळी खेळी केली. या खेळीसह संजूने विराट कोहली, मिचेल मार्श आणि केन विल्यमसन यांसारख्या दिग्गजांना मागे टाकून एका खास यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

संजू सॅमसन (Sanju Samson) आता टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम मार्लन सॅम्युअल्स आणि केन विल्यमसन (दोघेही 85 धावा) यांच्या नावावर होता.

टी-20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

संजू सॅमसन (भारत): 89 (46) – वि. न्यूझीलंड (2026)
मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडिज): 85* (66) – वि. इंग्लंड (2016)
केन विल्यमसन (न्यूझीलंड): 85 (48) – वि. ऑस्ट्रेलिया (2021)
विराट कोहली (भारत): 77 (58) – वि. श्रीलंका (2014)
विराट कोहली (भारत): 76 (58) – वि. दक्षिण आफ्रिका (2024)

गेल्या तिन्ही महत्त्वाच्या सामन्यांत संजू सॅमसनने जबरदस्त फलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे, तिन्ही वेळा तो शतकाच्या अगदी जवळ पोहोचून थोडक्यात चुकला. वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर-8 मध्ये त्याने 50 चेंडूत 97* धावा केल्या जिथे 3 धावांनी त्याचं शतक हुकलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध सेमी फायनल सामन्यात 42 चेंडूत 89 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये त्याने 46 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी केली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांमध्ये 255 धावांचा डोंगर उभा केला. टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---