आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला खेळवला जाईल. भारत या स्पर्धेचा अधिकृत यजमान आहे. मात्र, या स्पर्धेतील सर्व सामने यूएईमध्येच खेळवले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याबाबत भारतात विरोध होतो आहे. हा सामना रद्द करण्याची मागणीही होत आहे.
अलीकडेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 मध्ये इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात दोन सामने होणार होते. पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. दरम्यान, आता आशिया कप 2025 संदर्भात संजू सॅमसनचं मोठं विधान समोर आलं आहे.
त्याने म्हटलं आहे की, मागच्या वेळी मी यूएईमध्ये अंडर-19 वर्ल्ड कप आणि आयपीएल खेळलो होतो. मला तिथल्या लोकांकडून नेहमीच जबरदस्त पाठिंबा आणि उत्साह मिळाला आहे. मला आशा आहे की यावेळीही असाच अनुभव मिळेल.






