मुंबई । एम.आय.जी. आणि शिवाजी पार्क जिमखाना यांनी अनुक्रमे वेंगसरकर अकादमी आणि यजमान स्पोर्टिंग युनियन क्लब यांना पहिल्या डावातील आघाडीवर पराभूत करून ७व्या संतोष कुमार घोष ट्रॉफी (१६ वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वेंगसरकर अकादमीच्या १३४ धावांचा पाठलाग करताना जय जैन (नाबाद ७५) आणि अर्जुन दानी (३७) यांच्या धडाकेबाज फलंदाजीने एम.आय.जी. संघाचा विजय सुकर केला. एम.आय.जी. संघाने ४१ षटकात ४ बाद १३८ धावा करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेच्या दुसऱ्या लढतीत काल २३० धावांचे लक्ष्य उभारणाऱ्या शिवाजी पार्क जिमखाना संघाने यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबला १८४ धावांत गुंडाळत पहिल्या डावातील आघाडीसह आपला विजय निश्चित केला. डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य जाधव याने ४८ धावांत ६ विकेट घेत संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. खेळ संपताना शिवाजी पार्क जिमखाना संघाने दुसऱ्या डावात बिनबाद ९८ धावा केल्या होत्या. राज देशमुखने सलग दुसरे अर्धशतक फटकावताना नाबाद ६५ धावा केल्या.
माहीम ज्युवेनाईल संघाने अवर्स सी.सी. संघाला काल १२५ धावांत गुंडाळले होते आणि आज ९ बाद २२४ धावा करून त्यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. काल प्रतिस्पर्धी संघाचा निम्मा संघ ३७ धावात गारद करणारा आयुष झिमरे याने आज फलंदाजीतही चमक दाखविताना ४९ धावा केल्या तर श्रेयांस शेडगे याने स्टायलिस्ट ७१ धावा केल्या. अन्य लढतींमध्ये स्टायलो क्रिकेटर्सचा अरुण गुप्ता (४६/५), तसेच न्यू इरा संघाचे अमान मणिहार (३९/५) आणि साद शेख (४०/५) या गोलंदाजांनी प्रत्येकी पांच बळी मिळवत आपल्या संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक :वरळी सी.सी. ३५.४ षटकात सर्वबाद १३३ (यश गुप्त ३२, सुमीत जोशी ४३/३) पराभूत वि. के.आर.पी. इलेव्हन ४१ शतकात १ बाद १३६ (वेदप्रकाश जैस्वाल नाबाद ६९, आयुष जेठवा नाबाद ५३)
अवर्स सी.सी. ४७ षटकात सर्वबाद १२५ (भार्गव पाटील २७; आयुष झिमरे ३७/५, अर्पण पॉल २२/३) पराभूत वि. माहीम ज्युवेनाईल्स ५५.५ षटकात ९ बाद २२४ (सूर्यांश शेडगे ७१, आयुष झिमरे ४९,शुभम बारस्कर ४८/२, चैतन्य शेडगे ५२/२, भार्गव पाटील ५८/२, प्रथम साळसकर १८/२))
वेंगसरकर अकादमी ४७.२ षटकात सर्वबाद १३४ (हर्ष राणे ५८, निलय पवार १३/५, अथर्व डाकवे २७/३) पराभूत वि. एम.आय.जी. ४१ षटकात ४ बाद १३८ (अर्जुन दानी खेळत आहे ३७,जय जैन नाबाद ७३)
शिवाजी पार्क जिमखाना ७० षटकात सर्वबाद २३० (आदित्य आनंद ६१, राज देशमुख ५२, हर्ष साळुंखे ३४, रोमांच भाटकर ३३; मुशीर खान ९०/४, रितेश दराडे ८९/४) वि. वि. स्पोर्टिंग युनियन बिनबाद ४०.५ षटकात सर्वबाद १८४( मुशीर खान ७५, आर्यन दास २९;आदित्य जाधव ४८/६, मंथन कोरगावकर ३२/२).
माझगाव सी.सी. ३८.४ षटकात सर्वबाद १४६ (यश कदम ३५, यश क्रिपाल २६, विनीत परमार २१/३, तनिष हिर्लेकर १४/२, विस्मित राऊत १५/२) वि.वि. विजय सी.सी. ३१.४ षटकात सर्वबाद ६८ (यश क्रिपाल २१/३, वरद शिंदे २/२)
स्टायलो क्रिकेटर्स- ५८ षटकात सर्वबाद १७८(मेहताब उस्मानी ३३, मोह्मद आदिल शेख ४८/४) व २७ षटकात ३ बाद १५४ (मेहताब उस्मानी ६५, रोषन कनोजिया ३०) वि.वि. पय्याडे स्पोर्ट्स क्लब ४२.४ षटकात सर्वबाद १३५ (अमित शर्मा ६७, अरुण गुप्ता ४६/५, आदिल शेख २३/२)
न्यू ईरा ६४.५ षटकात सर्वबाद १४८ (तेजस चाळके ५९, हर्ष मोगावीरा १८/३, दिव्यांश सिंघ २४/२, दशरथ चव्हाण २९/२, हिमांशू सिंघ ४१/२) आणि ४३ षटकात ५ बाद १९१ (अवेस खान नाबाद ६१, मोहित तंवर ४७, ओवेस शेख ३१, दशरथ चव्हाण ३५४२ षटकात सर्वबाद १०३ (दशरथ चव्हाण ६४, अमान मणिहार ३९/५, साद शेख ४०/५)-.
मुंबई पोलीस जिमखाना ५६.४ षटकात सर्वबाद ११५(प्रतिक यादव ३७, शुभम खरात २६/४, जश गानिगा २६/५)पराभूत वि. दादर पारसी कॉलनी ५३ षटकात ३ बाद १६५ (अनुराग नायर ५३, जाश गानिगा नाबाद ४१; ओजस मुळे ३६/३).