सध्या सर्वत्र आयपीएल 2023 हंगामाची चर्चा सुरू आहे. प्रत्येक संघाने हंगामातील आपला पहिला सामना खेळला आहे. या रोमांचक स्पर्धएदरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल आणि शॉ यांच्यातील वाद दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. अशात आयपीएल सुरू असताना सपनाने पुन्हा एकदा शॉ आणि त्याच्या मुत्रांविरुद्ध फोजदारी खटला दाखल केला आहे.
सोशल मीडियाव इन्फ्लूएंसर सपना गिल (Sapna Gill) हिने पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावर काही गंभीर आरोप केले. चुकीच्या पद्धतीने हात लावणे आणि धक्काबुक्कीचे आरोप सपनाकडून शॉविरोधात केले गेले आहेत. तसेच शॉने बॅटने आपल्यावर हमला केल्याचेही समपानच्या आरोपांमध्ये म्हटले गेले आहे. तिने कलम 354, 509 आणि 324 अंतर्गत अंधेरी दंडाधिकाऱ्यांसमोर फोजदारी खटला दाखल केला आहे. सपनाच्या वकिलांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा एअरपोर्ट पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटूविरोधात गुन्हा नोदवण्यास स्पष्टपणे नकार दिला होता, असे सपनाच्या वकिलांनी सांगितले आहे. आता या प्रकरणावर 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचेही वकिलांनी सांगितले.
दरम्यान, सपना गिलला आधीच या प्रकरणात अटक झाली होती. 16 फेब्रुवारी 2023 रोजी ओशिवार पोलिसांनी गिलवर हल्ला करण्याच्या आरोपात तिला अटक केली होती. मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये सपना आणि तिच्या मित्रांनी गुलवर हल्लाच्या प्रकरणात ती चांगलीच अडकली होती. शॉसोबत एक सेल्फी घेण्यावरून हा वाद सुरू झाला होता. हा प्रकार घडल्यानंतर चार दिवसांनी सपना आणि तिच्या मित्रांना जामीन मिळाला.
दरम्यान, शॉ प्रतिनिधित्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 50 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीला 6 विकेट्सने पराभव मिळाला. या दोन्ही पराभवांमध्ये शॉचे प्रदर्शन देखील कारणीभूत ठरले. पहिल्या सामन्यात शॉने 12, तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या 7 धावांची खेळी केली. (Sapna Gill has filed a criminal case against Prithvi Shaw even as IPL 2023 begins)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घातक इंग्लिश गोलंदाजाची आयपीएलमधून माघार, आरसीबी पर्यायी खेळाडूच्या शोधात
लेट पण थेट! KKRच्या गोलंदाजीपुढे बेंगलोरचा खेळ खल्लास, 81 धावांनी साकारला पहिला दमदार विजय