भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. शुक्रवारी (26 मे) गिनेल अवघ्या 60 चेंडूत 129 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावर आयपीएल 2023चा दुसरा क्वॉलिफायर सामना गुजरात टायटन्सने जिंकला. मुंबई इंडियन्सला या सामन्यात 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. याच पार्श्वभूमीवर गिलने सर्वत्र कौतुक होत असतानाच, त्यात आणि सारा अली खानमध्ये बिनसल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.
बॉलवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) मागच्या काही दिवसांपासून आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘जरा हटके जरा बचके’ असे साराच्या या नवीन चित्रपटाचे नाव आहे. यात प्रमुख अभिनेत्याची भूमिक विकी कौशल पार पाडत आहे. मागच्या मोठ्या काळापासून सारा अली खान आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांचे नाव एकमेकांशी जोडले जात आले आहे. दोघे एकमेकांना डेट करतात, अशा अंदाजली व्यक्त केला गेला आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. असे असले तरी, आता या दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार गिल आणि सारा यांनी आपले मार्ग वेगळे केले आहेत.
शुबमन गिल आणि सारा अली खान यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा वाढल्या होत्या. या दोघांकडूनही अद्याप आपल्या नात्याविषयी कुठलेच स्पष्टीकरण दिले गेले नाहीये. पण ताज्या माहितीनुसार आता गिल आणि सारा वेगळे झाले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार गिल आणि साराने एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. अशात चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, अखेर या दोघांमध्ये काय बिनसले आहे. असेही सांगितले जात आहे की, गिल आणि सारा अली खानने एकत्र चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलरचे नावही अनेकदा एकत्र जोडले गेले आहे. पण या दोघांच्या रिलेशनविषयी देखील अद्याप कुढलीच माहिती समोर आली नाहीये. सोशल मीडियावर देखील अनेकदा गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्याविषयी चर्चा होताना दिसतात. (Sara Ali Khan and Shubman Gill unfollow each other on social media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टिम डेविडची एक चूक अन् मुंबईचं फयनलचं तिकिट कॅन्सल! मोजावी लागली 99 धावांची किंमत
आकाश मधवालचा ‘हिरो ते झिरो’चा प्रवास! गुजरात टायटन्सच्या फलंदाजांकडून धुलाई