भारताचा तरुण वेगवान गोलंदाज आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर आज (24 सप्टेंबर) आपला 25 वा वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवशी क्रिकेटजगतातून अर्जुनवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच अर्जुनची मोठी बहिण सारा तेंडूलकर हिनेही आपल्या भावाला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना साराने शेअर केलेली पोस्ट पाहून तिचे आपल्या भावाबद्दलचे प्रेम स्पष्टपणे दिसत आहे.
अर्जुनच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त बहीण साराने त्याला खास सरप्राईज पार्टी दिली. याशिवाय तिने दोघांचे बालपणीचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये अर्जुन साराच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. 6 फोटोंच्या या पोस्टमध्ये अर्जुनचे इतरही फोटो आहेत. साराने या पोस्टला कॅप्शन दिले की, ‘घरातील बाळाला आणि आमच्या विश्वाचे केंद्रस्थान असलेल्या मुलाला 25 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यावर आमचे खूप प्रेम आहे आणि आम्हाला नेहमी तुझा अभिमान आहे.’
View this post on Instagram
दरम्यान अर्जुन आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो आधी मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला पण हळूहळू तो गोव्याकडे आकर्षित झाला. तो सध्या फक्त गोव्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे. अलीकडेच, देशांतर्गत स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध गोव्याचे प्रतिनिधित्व करताना, अर्जुनने प्रभावी गोलंदाजी करत 9 विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामुळे त्याच्या संघाला मोठा विजय नोंदवण्यात मदत झाली.
अर्जुनची क्रिकेटची आवड वयाच्या आठव्या वर्षीपासून सुरू झाली. वयाच्या 11 व्या वर्षी, त्याने हॅरिस शिल्ड स्पर्धेत पदार्पण केले, जिथे त्याने आठ विकेट्स घेत आपली छाप पाडली. वडील सचिन तेंडुलकरने अर्जुनला मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याचे प्रशिक्षक अतुल गायकवाड आणि सुप्रसिद्ध गोलंदाजी प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्जी यांना नियुक्त केले होते. या तज्ञांनी अर्जुनला वेगवान गोलंदाजी सुधारण्यास मदत केली.
हेही वाचा-
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त वडील सचिन तेंडुलकरची मन जिंकणारी पोस्ट; म्हणाला, “माझ्या गुणी…”
‘मन’ खूप झालं आता ‘जग’ जिंकायचंय! टी20 विश्वचषकापूर्वी कर्णधार हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाला चेतावणी
भारत वि. बांगलादेश संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठा गोंधळ, कानपूर स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ