भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17 व्या सामन्यात बांगलादेश संघाने भारतापुढे 287 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी वादळी सुरुवात दिली. रोहित सोबतच गिल याने देखील काही मोठे फटके मारले. त्याने एकाच षटकात सलग दोन षटकार मारल्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी व गिलची तथाकथित गर्लफ्रेंड असलेल्या सारा तेंडुलकरचा आनंद गगनात मावेनासा झाला.
Sara Tendulkar clapping after Shubman Gill's two sixes. pic.twitter.com/cGKHDUyyX4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
विजयासाठी 257 धावांचे लक्ष मिळाल्यानंतर रोहित व गिल यांनी पहिल्या षटकापासून मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गिल काहीसा संयम दाखवून खेळत होता. मात्र, दहाव्या षटकात त्याने नसूम याच्यावर विशेष हल्ला चढवला. त्याने त्याला तीन चेंडूंमध्ये दोन खणखणीत षटकार ठोकले. त्यानंतर या सामन्यासाठी हजेरी लावलेल्या सारा तेंडुलकर हिचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Sara Ji excited even for a edge four by Shubman Gill 🤣🤣🤣🤣🤣
Love is in the air.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍 pic.twitter.com/p6E2MBf9Ee— Barnav.🏏 (@Cricket_Arnav) October 19, 2023
सारा आणि शुबमन मागील जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र याबाबत दोघांनी देखील कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. परंतु सोशल मीडियावर ते अनेकदा एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसतात.
(Sara Tendulkar Happy After Shubman Gill Two Sixes Against Bangaladesh)
महत्वाच्या बातम्या –
लिटन-तंझीदने बांगलादेशसाठी केला मोठा पराक्रम, तब्बल 25 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये…
“माझ्यावर पाकिस्तानात हल्ला झालेला”, इरफानचा 17 वर्षांनी गौप्यस्फोट, वाचा सविस्तर