सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर अनेकदा वेगवेगळ्या संदर्भात चर्चेत असते. अलीकडेच तिने लंडनमधून शिक्षण पूर्ण केले आहे. यासंदर्भात सचिनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. आता साराला महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. तिला सचिन तेंडुलकर फाउंडेशनचे संचालक करण्यात आले आहे. खुद्द सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. साराला तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे पद मिळाले आहे.
साराने लंडनमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिने क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण मध्ये पदवी प्राप्त केली आहे. हा पोषण आणि आहारशास्त्राशी संबंधित विषय आहे. यामध्ये पोषण आहाराबाबत अभ्यास केला जातो. साराने लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आता साराला सचिन तेंडुलकर फाऊंडेशनचे संचालक बनवण्यात आले आहे. खुद्द सचिनने ही माहिती चाहत्यांना दिली.
सचिनने सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अनेक छायाचित्रांचाही समावेश आहे. ज्यात त्याने लिहिले की, “मला हे कळवायला अतिशय आनंद होत आहे की माझी मुलगी सारा तेंडुलकर ‘सचिन तेंडुलकर फाऊंडेशन’ मध्ये दिग्दर्शक म्हणून सामील झाली आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून तिने क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
I’m overjoyed to share that my daughter Sara Tendulkar has joined the @STF_India as Director.
She holds a Master’s degree in Clinical and Public Health Nutrition from University College London. As she embarks on this journey to empower India through sports, healthcare, and… pic.twitter.com/B78HvgbK62
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 4, 2024
साराने सचिन तेंडुलकर फाऊंडेशनसाठी खूप आधी काम करायला सुरुवात केली होती. नोव्हेंबरमध्ये ती राजस्थानच्या उदयपूरला गेली होती. तिने तेथील ग्रामीण भागाचा दौरा केला होता. सारा सरकारी शाळेतही गेली. या दौऱ्याची छायाचित्रे सचिनने इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. साराच्या सोबत तिची आई अंजली तेंडुलकर होती.
हेही वाचा-
फलंदाजांची ताजी कसोटी रँकिंग; यशस्वी-कोहलीला झटका, गिलचीही घसरण
“पाकिस्तानची मनमानी चालणार नाही”, बीसीसीआयचा आयसीसीला कडक संदेश
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! भारताला एकहाती जिंकवून दिला सामना