भारतीय युवा सलामी फलंदाज शुबमन गिलने बुधवारी (८ सप्टेंबरला) त्याचा २२ वा वाढदिवस साजरा केला. त्याला वाढदिवशी आयसीसी, बीसीसीआय तसेच अनेक दिग्गज खेळाडूंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तो त्याच्या वाढदिवशी चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर लाईव्ह देखील आला होता.
त्याच्या चाहत्यांनी त्याला लाईव्हदरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गिलच्या लाईव्हदरम्यान त्याला भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरनेही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
साराने गिलच्या लाईव्हदरम्यान त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले, “HBDDDDDD”. आता साराने गिलला दिलेल्या शुभेच्छांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत आहेत. पण काही दिवसांपूर्वी गिलने तो सिंगल असल्याचे सांगितले होते. मात्र, आता साराने शुभेच्छा दिल्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे.

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर हे दोघे एकमेकांना इंस्टाग्रामवर फाॅलो करता. विशेष म्हणजे या दोघ एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही फाॅलो करतात. तसेच दोघे सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स नेहमीच करत असतात. याच करणांमुळे त्यांच्या रिलेशनच्या बातम्या व्हायरल होत असतात. असे असले तरी, हे दोघे त्यांच्यातील संबंधांविषयी कधीच काही बोलले नाहीत.
शुबमन सध्या यूएईमध्ये आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी दाखल झाला आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना दिसणार आहे. केकेआर आयपीएल२०२१ च्या पहिल्या पर्वात काही खास कामगिरी करू शकला नव्हता. संघाने खेळलेल्या ७ सामन्यांपैकी केवळ २ सामने जिंकले आहेत.






