इंग्लंड महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलरने(Sarah Taylor) शुक्रवारी(27 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती(Retirement) घेतली आहे. साराला मागील काही वर्षांपासून मानसिक त्रास होत असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे.
निवृत्तीनंतर तिने ट्विट केले आहे की ‘2006 मध्ये माझे स्वप्न सत्यात उतरले. मी इतक्यावर्षात दिग्गज खेळाडूंसह आणि व्यक्तीसह जे मिळवले आहे, त्याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी आणि माझ्या आरोग्यासाठी निवृत्तीचा निर्णय योग्य आहे. मी इंग्लंडच्या जर्सीत प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला आहे. मला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार’
In 2006 my dream came true and I beam with pride at what I've achieved over the years, alongside the best players and people. It is the right time for me and my health to retire, but I have loved every minute in an England shirt. Thank you to everyone for supporting me ❤️ pic.twitter.com/8MdTqpgmWe
— Sarah Taylor (@Sarah_Taylor30) September 27, 2019
2006 मध्ये इंग्लंडकडून क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या साराने 10 कसोटी सामन्यात 300 धावा केल्या आहेत. तसेच तिने 126 वनडे सामन्यात 7 शतके आणि 20 अर्धशतकांसह 4056 धावा केल्या आहेत. याबरोबरच तीने आंतरराष्ट्रीय महिला टी20 मध्ये 90 सामन्यात 2177 धावा केल्या आहेत. यात तिच्या 16 अर्धशतकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे साराने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 51 यष्टीचीत केले आहेत. त्यामुळे ती महिला आणि पुरुषांमध्ये टी20 मध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारी यष्टीरक्षक आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक यष्टीचीत करणारीही एकमेव क्रिकेटपटू आहे.
साराला 2014 मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेटपटूचा तर 2012, 2013 आणि 2018 मध्ये सर्वोत्तम महिला टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे.
तसेच 2009 आणि 2017 च्या महिला वनडे विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंड महिला संघात साराचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारे यष्टीरक्षक(महिला पुरुष मिळून) –
51 – सारा टेलर
42 – एलिसा हेली
39 – बतूल फातिमा
34 – एमएस धोनी
34 – मेरिसा अगुइलीरा
6️⃣5️⃣3️⃣3️⃣ international runs – second-most for England women
2️⃣3️⃣2️⃣ international dismissals – the most in women's cricket
3️⃣ world titles
3️⃣ ICC Women's T20I Cricketer of the Year awards
1️⃣ ICC Women's ODI Cricketer of the Year awardSarah Taylor: all-time great 👏 pic.twitter.com/nuuIREBqrh
— ICC (@ICC) September 27, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाचे टेंशन वाढले, रोहित शर्मा झाला शून्यावर आऊट
–युवराज म्हणतो, तर मी अजून एक विश्वचषक खेळलो असतो!
–सौरव गांगुली पुन्हा एकदा सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी