भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याची अशी इच्छा होती की, या महान खेळाडूला निरोपाचा सामना मिळायला हवा होता. परंतु, असे होऊ शकले नाही ज्यामुळे सर्वांनी निराश झाली. धोनीला निरोपाचा सामना का मिळू शकला नाही, या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत अनुत्तरीत होते. मात्र, भारताचे माजी फिरकीपटू आणि निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी प्रथमच धोनीचा निरोप सामना न मिळण्यामागील कारण उघड केले.
‘या; कारणाने नाही मिळाला धोनीला सामना
सरनदीप सिंग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा करताना म्हटले, “एमएस धोनीने २०१९ मधील वनडे विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना खेळला होता, जो त्याचा शेवटचा सामना ठरला. परंतु,, ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी२० विश्वचषक २०२० मध्ये त्याला भाग घ्यायचा होता. त्यावेळी कोविड-१९ साथीच्या रोगामुळे तो विश्वचषक पुढे ढकलण्यात आला. धोनीने आपल्याला पहिल्या टी२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. त्याला इतका अनुभव होता की, आम्ही त्याला टी२० विश्वचषक २०२० साठी संघात घेण्याचा विचारही केला होता, परंतु, तसे होऊ शकले नाही. यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. टी२० विश्वचषक आयोजित केला गेला असता तर, तो त्यात खेळला असता आणि कदाचित तिथेच त्याने निवृत्ती घेतली असती.”
विश्वचषकात खेळला अखेरचा सामना
विराट कोहलीच्या नेतृत्वात धोनीने न्यूझीलंडविरुद्ध २०१९ वनडे विश्वचषक २०१९ मध्ये उपांत्य सामना खेळला आणि त्यात भारतीय संघाचा पराभव झाला. धोनीसाठीदेखील हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. पुढच्या वर्षी त्याने निवृत्तीची घोषणा केली. धोनीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अतिशय भावूक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली.
धोनीच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. सध्या धोनी आयपीएलमध्ये खेळतो. तो २००८ पासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे. सध्या स्थगित झालेल्या आयपीएल २०२१ हंगामात धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची कामगिरी चांगली झाली होती. आयपीएलचा उर्वरित हंगाम १९ सप्टेबरपासून सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या:
कोहलीने मैदानावरची आक्रमकता कमी करायला हवी, वेस्ट इंडिज दिग्गजाचा सल्ला
आयसीसी क्रमवारीत मितालीचे राज, दमदार अर्धशतकासह पटकावले पाचवे स्थान
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुजाराला मिळणार नारळ? या तीन फलंदाजांचे आहेत पर्याय