जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा फटका पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला होता. या स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे अर्ध्यातून ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. मात्र येत्या काही दिवसात अबू धाबीमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सहभागी खेळाडू अबू धाबीला रवाना होऊ लागले आहेत.
अशातच पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत (पीएसएल) क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या सरफराज अहमदसोबची फजिती झाल्याचे दिसून आले आहे.
जून महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेसाठी क्वेटा ग्लॅडिएटर्स संघासह इतर संघांनीही अबू धाबीची वाट धरायला सुरुवात केली आहे. परंतु क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा कर्णधार अहमद, इतर ११ खेळाडू आणि अधिकाऱ्यांना विमानात चढण्याची अनुमती दिली गेली नाही. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, या खेळाडू आणि अधिकाऱ्यांना लाहोर आणि कराचीवरून दोहामार्गे अबू धाबी गाठायची होती. परंतु त्यांना विमानात चढण्याची परवानगी दिली गेली नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आयोजनात गडबड
खेळाडू व अधिकारी यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पीएसएल मार्चच्या सुरुवातीस स्थगित करण्यात आले होते. त्यावेळी केवळ १४ सामने खेळले गेले होते. यानंतर आता अबू धाबी येथे पीएसएलचे उर्वरित सामने आयोजित करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बऱ्याचशा तार्किक (लॉजिस्टिकल) मुद्द्यांचा सामना करावा लागला आहे. यात व्हिसा मिळण्यासह इतर काही मुद्द्यांचा समावेश आहे.
पुन्हा हॉटेलमध्ये परतावे लागले
माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘पीएसएलच्या क्वेटा ग्लॅडिएटर्स संघांमधून केवळ ५ जणांना अबु धाबीच्या विमानात चढण्याची परवानगी देण्यात आली आहे. उरलेल्या खेळाडूंना २४ मेपासून क्वारंटाईनमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये परत जावे लागले आहे. दोन्ही शहरांतील २५ हून अधिक खेळाडूंना चार्टर्ड विमानातून युएईला जायचे होते. परंतु पीसीबीने त्यांना व्यावसायिक उड्डाणमार्गे पाठविण्याचा पर्याय निवडला आहे. यामुळे असा गोंधळ झाला आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
‘तेव्हा भट्टी तापलेली होती, म्हणून मी…,’ मांजरेकरांसोबतच्या २ वर्षे जुन्या विवादावर जडेजाचा खुलासा
मी चुकून झेल सोडला तरीही लोक म्हणतात, ‘होतं असं कधी-कधी’; जड्डूने व्यक्त केला आनंद
चेपॉक स्टेडियमवर पहिल्यांदा इंग्लंडला कसोटीत धूळ चारणारा भारतीय धुरंधर, नाव आहे ‘पंकज रॉय’