इराणी चषक (Irani Cup) 2024 मध्ये मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानने (Sarfaraz Khan) धमाकेदार खेळी खेळली. या 26 वर्षीय फलंदाजाने ‘रेस्ट ऑफ इंडिया’ (Rest Of India) संघाविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. भारत-बांगलादेश कसोटी मालिकेत त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. पण इराणी चषकात त्याने आपल्या नावावर एक असा रेकाॅर्ड केला, जो रेकाॅर्ड सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), रोहित शर्मा (Rohit Sharma), सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांना सुद्धा करता आला नाही.
सरफराज खान (Sarfaraz Khan) इराणी चषकात अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखालील मुंबई संघाचा भाग आहे. 65 वर्षांच्या इतिहासात मुंबईसाठी द्विशतक झळकावणारा सरफराज पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनी मुंबईसाठी योगदान दिले होते, परंतु त्यांना अशी कामगिरी करता आली नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत सरफराज 221 धावांवर नाबाद राहिला.
सरफराज खानने (Sarfaraz Khan) 1972 मध्ये नाबाद 194 धावा करणाऱ्या रामनाथ पारकरला (Ramnath Parkar) मागे टाकले. त्याचवेळी त्याने कर्णधार अजिंक्य रहाणेलाही (Ajinkya Rahane) मागे टाकले, ज्याने 2010 मध्ये 191 धावा केल्या होत्या. मात्र, त्यावेळी मुंबईचा संघ शेष भारताकडून पराभूत झाला होता. दुहेरी शतक झळकावणारा सरफराज इराणी चषकातील 11वा फलंदाज ठरला. इराणी चषकात आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या वसीम जाफरच्या (Wasim Jaffer) नावावर आहे. त्याने इराणी चषकात सर्वाधिक 286 धावा ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
147 वर्षाच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच बनवला असा रेकाॅर्ड, जो मोडीत काढणे अशक्य
“भारतासाठी खेळताना…” टी20 विश्वचषकापूर्वी स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य
पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू मैदानावर खरंच करतो दुखापतीचं नाटक?