भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ‘शुबमन गिल’च्या (Shubman Gill) जागी संधी मिळालेल्या ‘सरफराज खान’ने (Sarfaraz Khan) सामन्याच्या चौथ्या दिवशी शानदार शतक झळकावले. त्याने 150 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान त्याने 18 चौकारांसह 3 षटकार ठोकले. सामन्यानंतर सरफराज खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सरफराज खान (Sarfaraz Khan) म्हणाला की, “मी माझ्या वडिलांशी अनेकदा बोलतो कारण ते सतत मला प्रेरित करत असतात, मला खूप भारी वाटले कारण भारतासाठी खेळताना हे माझे पहिले शतक होते, लहानपणापासून हे माझे स्वप्न होते, मी आता खूप आनंदी आहे.”
पुढे बोलताना सरफराज म्हणाला, “मी नेहमी लक्षात ठेवतो. भूतकाळात असे घडले आहे की उद्याचा विचार केल्याने माझे वर्तमान खराब झाले आहे, म्हणून आता मला फक्त वर्तमानात जगायचे आहे. मला उंच बाऊंस चेंडू खेळायला आवडते, माझ्याकडे घरी (मुंबई) एक बाउन्सी विकेट आहे ज्यावर मी नियमितपणे सराव करतो, ते (न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज) माझ्यासाठी ऑफच्या बाहेर लहान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि मी त्यानुसार खेळलो. ते मजेदार होते.”
शेवटी बोलताना तो म्हणाला, “ही खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नाही, मला वाटत नाही की खेळ अद्याप आपल्या हातातून गेला आहे, चेंडू अजूनही आत आणि बाहेर पडत आहे, त्यामुळे जर आपण त्यांच्या (न्यूझीलंड) 2-3 विकेट्स लवकर काढू शकलो तर असे असल्यास, त्याची फलंदाजी ढासळू शकते.”
हेही वाचा-
टीम इंडियाने कसोटीत बचाव केलेले सर्वात लहान 5 लक्ष्य
IND vs NZ; भारताचा पराभव टळला? शेवटच्या दिवशी असे असणार बेंगळुरूचे हवामान
भारतासाठी कसोटी सामन्यात 0 आणि 150 धावा करणारे टाॅप-3 खेळाडू, युवा स्टार खेळाडूचाही समावेश