मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश संघात सध्या बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने नाणेफेक जिंंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपली ४२वी रणजी ट्रॉफी जिंंकण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या मुंबई संंघातील सरफराज खान ( Sarfaraz Khan) वगळता कोणतेच फलंदाज खेळपट्टीवर निभाव धरू शकले नाही. या सामन्यात त्याने शतक ठोकले आहे. अशा या शतकवीर सरफराजचा सेलेब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.
या सामन्यात धडाकेबाज फलंदाज सरफराज या हंगामातील चौथे शतक केले आहे. त्याने या हंगामात १३३ पेक्षा अधिक सरासरीने ९३० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने शतकासाठी १२ चौकार मारले यावेळी त्याने एकही चेंडू हवेत मारला नाही. शतक झाल्यावर त्याने काही मोठे शॉट्स मारले. त्यामध्ये एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात तो १३४ धावा करत बाद झाला. यशस्वी जायसवालने ७८ धावा केल्या. या दोघांना वगळता मुंबईचा कोणताच फलंदाज ५० पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. पहिल्या डावात मुंबईच्या सर्वबाद ३७४ धावा झाल्या आहेत.
शतक केल्यानंतर सरफराजने नेहमीप्रमाणे त्याचे जोरदार सेलेब्रेशन केले. यामध्येे तो खूपच भावूक दिसत असून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) डोमेस्टीकने आणि काही ट्वीटरवापरकर्त्यांनी त्याच्या व्हिडिओ शेयर केला आहे. यानंतर त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
💯 for Sarfaraz Khan! 👏 👏
His 4⃣th in the @Paytm #RanjiTrophy 2021-22 season. 👍 👍
This has been a superb knock in the all-important summit clash. 👌 👌 #Final | #MPvMUM | @MumbaiCricAssoc
Follow the match ▶️ https://t.co/xwAZ13U3pP pic.twitter.com/gv7mxRRdkV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 23, 2022
रणजी ट्रॉफीच्या ८७ वर्षाच्या इतिहासामध्ये सरफराज हा तिसराच खेळाडू आहे ज्याने दोन रणजीच्या हंगामात ९०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याच्याआधी अजय शर्मा आणि वसीम जाफर यांनी ही कामगिरी केली आहे.
रणजी ट्रॉफीच्या दोन हंगामात ९०० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
१) अजय शर्मा – १०३३ धावा (१९९६-९७) आणि ९९३ धावा (१९९१-९२)
२) वसीम जाफर – १२६० धावा (२००८-०९) आणि १०३७ धावा (२०१८-१९)
३) सरफराज खान – ९२८ धावा (२०१९-२०) आणि ९३७*धावा (२०२१-२२)
रणजी ट्रॉफीमध्ये सरफराजची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने ३४ डावांमध्येे ८ वेळा १००चा आकडा पार केला आहे. त्याचबरोबर त्याने ७ वेळा १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मुंबई संघाला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचवण्यात सरफराज बरोबर शम्स मुलाणी यानेही महत्वाची भुमिका पार पाडली आहे. त्याने या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
मध्य प्रदेशच्या पहिल्या डावाला सुरूवात झाली असून त्यांनी एक विकेट गमावत ४६ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा तळपली सरफराज खानची बॅट, रणजीच्या अंतिम सामन्यात शतक ठोकत द्रविड-लक्ष्मणला सोडले मागे
Video: आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेला जडेजा इंग्लंडमध्ये ठरणार हीट? नेटमध्ये करतोय कसून तयारी