दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या सामन्यात इंडिया बी कडून खेळताना सरफराज खान पहिल्या डावात अपयशी ठरला. मात्र त्याचा धाकटा भाऊ मुशीर खाननं ही कसर भरून काढली. मुशीर खानही दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाकडून खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या डावात त्यानं दमदार शतक झळकावलं. हे त्याचं या स्पर्धेतील पहिलं आणि प्रथम श्रेणी कारकिर्दीतील तिसरं शतक आहे. तो पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे.
मुशीर खाननं 205 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आपले शतक पूर्ण केलं. मुशीर अवघ्या 19 वर्षांचा आहे. परंतु त्यानं ज्या प्रकारचा खेळ दाखवला, त्यावरून तो तरुण वयातच परिपक्व फलंदाज बनल्याचं जाणवतं. मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खान यानं भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. मात्र, आजच्या सामन्यात त्याला 35 चेंडूत केवळ 9 धावा करता आल्या.
मुशीर खाननं शतक साजरं केल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये बसलेला त्याचा मोठा भाऊ सरफराज खूपच आनंदी दिसला. त्यानं टाळ्या वाजवून आपल्या लहानं भावाचं अभिनंदन केलं. बीसीसीआयनं आपल्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Musheer Khan brings up his 💯 🙌
A special celebration and a special appreciation from brother Sarfaraz Khan 👏#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/92lj578cAs
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 5, 2024
मुंबईच्या कुर्ला येथे जन्मलेला मुशीर खान हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो बॅट तसेच चेंडूनं संघासाठी योगदान देऊ शकतो. मुशीर खाननं आतापर्यंत 6 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्याच्या 10 डावात त्यानं 529 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यानं द्विशतकही झळकावलंय. यावरून तो आपल्या खेळीचं मोठ्या डावात रूपांतर करू शकतो, हे दिसून येतं.
मुशीर खाननं रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात बडोद्याविरुद्ध 203 धावांची नाबाद खेळी केली होती. याशिवाय त्यानं फायनलमध्येही शतक झळकावलं होतं. आता दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या डावात त्यानं शतक ठोकलं आहे. आता दुसऱ्या डावात तो काय कमाल करतो, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
हेही वाचा –
इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार, दुसऱ्या देशात खेळली जाऊ शकते मालिका; काय आहे कारण?
भारतीय वंशाच्या स्टार क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये लढतोय आयुष्याची लढाई
असं करणं अशक्यच! शुभमन गिलनं मागे धावत जाऊन घेतला अविश्वसनीय झेल, VIDEO एकदा पाहाच