भारतीय क्रिकेट संघाकडून सरफराज खान याने अखेर गुरुवारी (15 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या काही हंगामांमध्ये सरफराजने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अद्याप संधी मिळाली नव्हती. गुरुवारी आपल्या मुलाला कसोटी पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर सरफराजच्या वडिलांनी रोहितकडे खास विनंती केली.
सरफराज खान (Sarfaraz Khan) आणि मुशीर खान (Musheer Khan) हे सख्खे भाऊ आहेत. नौशाद खान यांची ही दोन मुले असून सध्या दोघेही भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. सरफराजने गुरुवारी (15 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यातून कर्णधार रोहित शर्मा याने ही संधी त्याला दिली. सरफराजला कसोटी पदार्पणाची कॅप दिली जात होती, तेव्हा त्याचे वडील आणि पत्नी मैदानात उपस्थित होते. दोघांनाही अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
Rohit Sharma congratulated #SarfarazKhan father and Wife before Match!#INDvENG pic.twitter.com/qIGcMz4EKy
— Italian Vinci (@Antoniakabeta) February 15, 2024
सरफराजला कसोटी कॅप मिळाल्यानंतर कर्णधार रोहित आणि नौशाद खान (Naushad Khan) यांच्यात चर्चा झाली होती. आता दोघांमध्ये नक्की काय बोलणे झाले, याचा व्हिडिओ समोर येत आहे. नौशाद खान रोहितला म्हणतात, “सर, कृपया सरफराजची काळजी घ्या.” यावर रोहित म्हणाला, “अरे सर, नक्की नक्की. सरफराजसाठी तुम्ही काय त्याग केला आहे, हे सर्वांना माहीत आहे. तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन.” रोहितने यावेळी सरफराजच्या पत्नीचेही अभिनंदन केले.
Centuries from Jadeja (110*) and Rohit Sharma (131) guide #TeamIndia to 326/5 at Stumps on Day 1 of the 3rd Test.
Scorecard – https://t.co/eYpzVPnUf8 #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/KVSDlNKmQG
— BCCI (@BCCI) February 15, 2024
(Sarfaraz’s father refers to Rohit as Sir, the captain’s heart-wrenching reply)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
Ravindra Jadeja । आजरपर्यंत फक्त दोन भारतीयांना जमलं ते जडेजानेही केली, राजकोट कसोटीतील शतक ठरलं खास
Rajkot Test । ज्याने धावबाद केले, सरफराजकडून त्याचाचे झाले कौतुक, पाहा पदार्पणवीर काय म्हणाला