सध्या रणजी चॅम्पियन मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात इराणी चषक सामना खेळला जात आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज सर्फराज खानने शानदार द्विशतक झळकावले आहे. सामन्याचा तिसरा दिवस संपल्यानंतर सर्फराजने त्याचा भाऊ मुशीर खानबद्दल सांगितले, जो 28 सप्टेंबर रोजी कार अपघातात जखमी झाला होता. सफाराझने आपली द्विशतकी खेळी त्याचा धाकटा भाऊ मुशीरला समर्पित केली.
मुशीर इराणी चषकाचाही एक भाग होता. मुंबईच्या संघात त्याचा समावेश होता. पण दुर्दैवाने त्याचा अपघात झाला. वडिलांसोबत लखनऊला जात असताना मुशीरचा अपघात झाला, रिपोर्ट्सनुसार, मुशीरच्या मानेला दुखापत झाली.
मोठा भाऊ सर्फराजने आपली खेळी मुशीरला समर्पित केली. जो अपघातामुळे सामना खेळू शकला नाही. इराणी चषकाचा तिसरा दिवस संपल्यानंतर द्विशतक झळकावणारा सर्फराज खान म्हणाला, “हा आठवडा माझ्यासाठी भावनिक ठरला. मी माझ्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना वचन दिले होते की, मी सेट झाल्यास, अर्धशतक पार केल्यास- शतक, मग मी दुहेरी शतकही करेन. जे की एक माझ्यासाठी आणि एक माझ्या भावासाठी.”
सर्फराज पुढे म्हणाला, “जर तो (मुशीर) ही खेळला असता तर अब्बूला अधिक अभिमान वाटला असता. दुर्दैवाने त्याचा अपघात झाला. त्यामुळे मला वाटले की या सामन्यात मला दुहेरी शतक झळकावायचे आहे.”
लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इराणी चषकाच्या सामन्यात सर्फराजने मुंबईसाठी शानदार खेळी खेळली. त्याने 25 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 222 धावा केल्या. सर्फराजच्या या खेळीमुळे मुंबईचा संघ 537 धावा फलकावर लावण्यात यशस्वी ठरला.
हेही वाचा-
वयाच्या 12 व्या वर्षी दिल्लीला पोहोचला, राहण्यासाठी घर नव्हते; या स्टार खेळाडूची कारकीर्द खूपच संघर्षमयी
नीरज चोप्राला सुपरस्टार बनवणाऱ्या प्रशिक्षकाने पदभार सोडले, जाणून घ्या कारण
टीम इंडिया ॲक्शनमध्ये, स्पर्धेतील पहिली लढत न्यूझीलंडशी, या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना