भारतात यंदा देशांतर्गत क्रिकेटचा संपूर्ण हंगाम खेळला जात आहे. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफीनंतर आता इराणी कप (Irani Cup) सामना सुरू झाला आहे. 2019-2020 रणजी विजेते सौराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील सामन्याला शनिवारी (1 ऑक्टोबर) राजकोट येथे सुरूवात झाली. पाच दिवसाच्या या सामन्यात रेस्ट ऑफ इंडियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुकेश कुमार, उमरान मलिक व कुलदीप सेन यांच्या भेदक गोलंदाजी पुढे सौराष्ट्राचा पहिला डाव 98 धावांवर आटोपला. त्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाच्या सर्फराज खानने शानदार नाबाद शतक करत आपल्या संघाला मोठ्या आघाडीच्या दिशेने नेले.
Pacers had a field day while Sarfaraz Khan (125*) & @Hanumavihari (62*) shone with the bat on Day 1 of the @mastercardindia #IraniCup. #SAUvROI
Here's how the action unfolded 🎥 🔽https://t.co/gngPH3SYJu pic.twitter.com/32B0lWqef3
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 1, 2022
तीन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुकेशच्या चार व उमरान-कुलदीपच्या प्रत्येकी तीन बळींच्या जोरावर रेस्ट ऑफ इंडियाने सौराष्ट्राला 98 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात रेस्ट ऑफ इंडियाची सुरुवात ही खराब झाली. मात्र, या संपूर्ण देशांतर्गत हंगामात आपल्या बॅटने अक्षरशः धावांचा पाऊस पाडणारा मुंबईचा सर्फराज खान पुन्हा एकदा चमकला. अवघ्या 93 चेंडूमध्ये त्याने शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाखेर तो 125 धावांवर नाबाद आहे.
सर्फराज हा रणजी ट्रॉफीपासून शानदार फॉर्ममध्ये आहे. तो यावर्षी स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. त्याने अंतिम फेरीतही शतक झळकावलेले. मात्र, मुंबईला विजेतेपद जिंकता आले नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दुलिप ट्रॉफी अंतिम सामन्यातही त्याच्या बॅटमधून शतक आले होते. पश्चिम विभागाने ही स्पर्धा मात्र आपल्या नावे करण्यात यश मिळवलेले. आता इराणी ट्रॉफी अंतिम सामन्यात शतक करून त्याने मानाच्या तीनही स्पर्धांच्या अंतिम फेरीत शतक झळकावण्याची कामगिरी करून दाखवली आहे. एकाच हंगामात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची ‘फिफ्टी’, भारताचे श्रीलंकेसमोर 151 धावांचे लक्ष्य
स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीला पंतने केले खुश! दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल