काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ घोषित केला. तेव्हापासून मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खान याचे नाव सातत्याने चर्चेत आहे. कसोटी संघात निवडले जाण्याची शक्यता असताना, त्याला ही संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली. नुकतेच त्याने एका मुलाखतीत निवड समितीने आपल्याला कशाप्रकारे आश्वासन दिले होते जे पाळण्यात आले नाही याचा खुलासा केला.
शानदार फॉर्म मध्ये असलेल्या सर्फराजने नुकतेच एका वृत्तसंस्थेशी बोलताना अनेक गोष्टींवर आपले मत व्यक्त केले. संघात आपली निवड न झाल्याने निराश झाल्याचे तो म्हणाला. तसेच, निवड समितीने आपल्याला संधी देण्याचे आश्वासन दिल्याचे देखील त्याने म्हटले. तो म्हणाला,
“बेंगलोर येथे रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर मी काही निवडसमिती सदस्यांना भेटलो. त्यांनी मला बांगलादेश दौऱ्यावेळी संधी देण्याचे म्हटले होते. मात्र, ती संधी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी चेतन शर्मा यांच्याशी देखील मुंबईतील एका हॉटेलमध्ये माझी अचानक भेट झाली. त्यावेळी ही त्यांनी तू संघाच्या जवळ आहेस थोडी मेहनत कर असे म्हटले. यावेळी देखील मला अपेक्षा होत्या मात्र मनासारखे घडले नाही.”
सर्फराजने 2019-20 रणजी ट्रॉफीमध्ये सहा सामन्यात 154.44च्या सरासरीने धावा काढल्या. त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतकांसह 928 धावा केल्या. हाच जबरदस्त फॉर्म त्याने 2021-22 हंगामात सुरू ठेवला. त्याने 122.75च्या सरासरीने 4 शतके आणि 2 अर्धशतकांसह 982 धावा केल्या. सध्या सुरू असलेल्या हंगामातही त्याने 431 धावा केल्या असून, त्याची सरासरी 107.75 एवढी आहे.
(Sarfraz Khan Put Allegations On Selection Committee For Not Considered Him For Test Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: विराटने धोनीच्या अंदाजात गाजवलं मैदान; ‘तो’ पॉवरफुल फटका मारताच समालोचकही म्हणाले, ‘माही शॉट’
सेंच्युरीनंतर विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पण अनुष्काच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली…