पाकिस्तानचा एकदिवसीय आणि टी -२० कर्णधार सर्फराज अहमदकडे आता कसोटी कर्णधारपद देखील देण्यात आले आहे. मिस्बाह-उल-हक च्या निवृत्तीनंतर सर्फराजला कर्णधार करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात मजल मारत भारताला नमवले होते. सर्फराजच्या चोख कामगिरीचे कौतुक देखील करण्यात आले.
आजवर सर्फराजने कधीही कसोटी सामन्यात नेतृत्व केले नाही पण त्याच्या एकदिवसीय आणि टी -२० यशाकडे पाहता तो एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला आहे. सर्फराझने एकदिवसीय कर्णधार म्हणून खेळलेल्या ९ सामन्यात पाकिस्तानने ७ सामने जिंकले आहेत, आणि ८ टी-२० सामन्यांपैकी ७ सामन्यात विजय मिळवला आहे.
आता सर्व प्रकारात असलेल्या कर्णधारपदाचा सर्फराज कसा उपयोग करून घेतो हे आपल्याला पाकिस्तानच्या आगामी दौऱ्यात दिसून येईल.