औंरंगाबाद, दि 21 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात सर्वज्ञ सरोदे, आदित्य योगी, नमन शहा, नीरज जोर्वेकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला.
औंरंगाबाद येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वज्ञ सरोदेने आपला राज्य सहकारी त्रिशिक वाकलकरचा 9-4 असा तर, आदित्य योगीने श्रीनाथ कुलकर्णीचा 9-2 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या नमन शहाने दिल्लीच्या अर्जुन दुआचे आव्हान 9-5 असे मोडीत काढले. तेलंगणाच्या जदोन नागबाथुलाने कर्नाटकाच्या मेघन बांदलाला 9-4 असे पराभूत केले. स्वर्णिम येवलेकरने पार्थ कुलकर्णीवर 9-2 असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या नीरज जोर्वेकरने तेलंगणाच्या प्रभाव कोयाचा 9-1 असा सहज पराभव करून दुसरी पात्रता फेरी गाठली.
14वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या मायरा टोपनो, सान्वी राजू, तमन्ना नायर, रित्सा कोंडकर, श्रावी देवरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14 वर्षांखालील मुले: पहिली पात्रता फेरी:
आदित्य योगी(महा)वि.वि.श्रीनाथ कुलकर्णी(महा) 9-2;
सर्वज्ञ सरोदे(महा)वि.वि.त्रिशिक वाकलकर(महा)9-4;
नमन शहा(महा)वि.वि.अर्जुन दुआ(दिल्ली) 9-5;
वीरेन सुर्यवंशी(महा)वि.वि.अभिनव महामुनी(महा) 9-3;
जदोन नागबाथुला(तेलंगणा)वि.वि.मेघन बांदला(कर्नाटक) 9-4;
स्वर्णिम येवलेकर(महा)वि.वि.पार्थ कुलकर्णी(महा) 9-2;
नीरज जोर्वेकर(महा)वि.वि.प्रभाव कोया(तेलंगणा) 9-1;
वेदांत कुलकर्णी(महा)वि.वि.अरमान शेख(महा) 9-0;
कृष्णा राणी(महा)वि.वि.मिहिर नायडू(कर्नाटक) 9-1;
वेदांत झोपे(महा)वि.वि.विश्वजीत चौधरी(महा) 9-5;
शिवराज जाधव(महा)वि.वि.आर्यन पाटील(महा) 9-0;
साईराज शेवाळे(महा)वि.वि.सय्यम पाटील(महा) 9-5;
निकुंज खुराना(तेलंगणा)वि.वि.विश्वास चंद्रसेकर(महा) 9-5;
14वर्षांखालील मुली: दुसरी पात्रता फेरी:
मायरा टोपनो(महा)वि.वि.नारायणी केळकर(कर्नाटक) 9-2;
सान्वी राजू(महा)वि.वि.अनुष्का महामुनी(महा) 9-5;
तमन्ना नायर(महा)वि.वि.प्रांजली पोंडुरे(महा) 9-1;
रित्सा कोंडकर(महा)वि.वि.रिया कुलकर्णी(महा)9-0;
श्रावी देवरे(महा)वि.वि.बीएन परिसारा(कर्नाटक) 9-0;
महत्वाच्या बातम्या –
आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या ऋतुजा भोसलेचे पुढचे लक्ष्य ऑलिम्पिक!
धागा खोल दिया! क्लासेन-जेन्सनने शेवटच्या 10 षटकात फोडली इंग्लिश गोलंदाजी, लुटल्या इतक्या धावा