पुणे, २० ऑक्टोबर २०२३: हँगझोऊ येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची टेनिस स्टार ऋतुजा भोसले हिने रोहन बोपन्नासह मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले. आता तिने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवण्यासोबतच क्रमवारीत टॉप-२०० मध्ये स्थान पटकावून कारकीर्दित अधिकाधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतून पुण्यात परतल्यानंतर ऋतुजाचा पुनित बालन ग्रुप (PBG) चे अध्यक्ष पुनित बालन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जान्हवी धारिवाल बालन यांच्यासह महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि ऋतुजाचे पती स्वप्नील गुगळे व तिची आई हे उपस्थित होते.
सत्कार समारंभात ऋतुजाने तिचा निर्धार बोलून दाखवला. “मी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले आहे. इतर खेळांप्रमाणे टेनिसमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिक तिकीट निश्चित करता येत नाही. मला माझे रँकिंग अधिक चांगले करायचे आहे आणि ग्रँड स्लॅममध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी ३२० वरून टॉप-२०० पर्यंत मजल मारायची आहे,” असे ऋतुजाने यावेळी सांगितले.
PBG च्या सहाय्याने भोसलेने तिच्या जागतिक क्रमवारीत लक्षणीय प्रगती केली आहे. एकेरीमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग ३१३ आहे. तिने गेल्या दोन वर्षांत दुहेरीतील सहा जेतेपदासह एकूण सात आयटीएफ जेतेपद जिंकली आहेत. “माझ्यासाठी आणि रोहन (बोपण्णा) साठी भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि १३ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकणे हा अभिमानाचा क्षण होता. आम्हाला या व्यासपीठावर पोहोचवण्यासाठी मिळालेल्या सर्व मदतीबद्दल आणि समर्थनाबद्दल मी आभारी आहे,” असे ऋतुजा पुढे म्हणाली.
आर्थिक मदतीमुळे तिला अधिक आधार मिळाला. निधीची कमतरता आणि इतर विविध आव्हानांची चिंता करण्याऐवजी तिला तिच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली. “ऋतुजा ही देशातील अनेक तरुण होतकरू खेळाडूंसाठी आदर्श आहे. PBG ऋतुजासारख्या प्रतिभावान खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक आर्थिक मदत देण्यासाठी वचनबद्ध आहे. मला खात्री आहे की ऋतुजा तिची मेहनत आणि ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवेल आणि ग्रँड स्लॅममध्ये भाग घेईल,”असे पुनित बालन यावेळी म्हणाले.
पुनित बालन यांच्याकडे टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो खो, बॅडमिंटन, क्रिकेट, आर्म रेसलिंग आणि बुद्धिबळ या विविध क्रीडा लीगमधील आठ क्रीडा संघांचे मालकी हक्क आहेत. शिवाय विविध क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील सुमारे ५० इच्छुक खेळाडूंना आर्थिक सहाय्य प्रदान करतात. (Rituja Bhosle, who won a gold medal in the Asian Games, is aiming for the Olympics!)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडकमध्ये एमसीए अ, पीवायसी हिंदू जिमखाना संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी
धागा खोल दिया! क्लासेन-जेन्सनने शेवटच्या 10 षटकात फोडली इंग्लिश गोलंदाजी, लुटल्या इतक्या धावा