---Advertisement---

धागा खोल दिया! क्लासेन-जेन्सनने शेवटच्या 10 षटकात फोडली इंग्लिश गोलंदाजी, लुटल्या इतक्या धावा

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (21 ऑक्टोबर) दुसरा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 399 धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी हेन्रिक क्लासेन याने वेगवान शतक झळकावले. अखेरच्या दहा षटकांमध्ये क्लासेन व मार्को जेन्सन यांनी तुफानी फटकेबाजी करत इंग्लंडला सामन्यात मागे टाकले.  

दक्षिण आफ्रिका संघाला त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. 35 व्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिका संघ सामन्यात आघाडीवर होता. मात्र, मार्करम व मिलर पुढील दोन षटकात बाद झाल्यानंतर संघ दबावात आलेला दिसला. पुढील चार षटकात क्लासेन व मार्को जेन्सन यांनी काहीसा सावध केला. मात्र, त्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला.

दोघांनी 42 व्या षटकापासून फटकेबाजीस सुरुवात केली. दोघांनी इंग्लंडच्या सर्वच वेगवान गोलंदाजांवर षटकार चौकारांची बरसात करत जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला. 41 वे, 45 वे व 50 वे षटक वगळता त्यांनी प्रत्येक षटकात दुहेरी आकड्यांच्या धावा काढल्या. 48 व्या व 49 व्या शतकात या दोघांनी प्रत्येकी 20 व 26 धावा वसूल केल्या. त्यांनी अखेरच्या दहा षटकात 143 धावा कुटल्या.

(Marco Jansen And Heinrich Klaseen Smash 143 Runs In Last 10 Overs Against England)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---