टॉप बातम्या

पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडकमध्ये एमसीए अ, पीवायसी हिंदू जिमखाना संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी

पुणे, दि. 20 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत एमसीए अ, पीवायसी हिंदू जिमखाना संघ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्धच्या लढतीत सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला.

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या लढतीत पहिल्या डावात एमसीए अ संघाने 62.1 षटकात सर्वबाद 309धावा केल्या. यात आयुष रक्ताडेने अफलातुन फटकेबाजी करत 90 चेंडूत 15 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 106 धावांची खेळी केली. त्याला पुष्कर अहिररावने 56चेंडूत 10 चौकारासह 51धावा, अभिनंदन गायकवाडने 50 धावा, समेक जगतापने 29, आर्यन गोजेने 21, सचिन सपाने 13 धावा करून साथ दिली. डेक्कन जिमखानाकडून वेदांत सणस(2-38), सर्वेश सुर्वे(2-39), अश्विन भापकर(2-42), साहिल कड(2-61) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात डेक्कन जिमखानाचा डाव 58.5 षटकात सर्वबाद 233 धावावर संपुष्ठात आला. यात जाईद शेख 55, साहिल कड 49, सर्वेश सुर्वे 41, वेदांत सणस 25, देवराज बेद्रे 18 यांनी धावा केल्या. एमसीए अ संघाकडून आफताफ शेख(4-32), साहिल मदार(2-39), समेक जगताप(2-20) यांनी अचूक गोलंदाजी करर एमसीए अ संघाला पहिल्या डावात 76धावांची आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात आज एमसीए अ संघाने दिवस अखेर 57 षटकात 5बाद 296धावा केल्या. यात अभिनंदन गायकवाड 84, आयुष रक्ताडे नाबाद 69, पुष्कर अहिरराव 63, सचिन सापा 30 , समेक जगताप 23 यांनी धावा केल्या. सामना अनिर्णित राहिल्यामुळे एमसीए अ संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला.

डिझायर स्पोर्ट्स कॉर्पोरेशन मैदानावरील लढतीत पहिल्या डावात पीवायसीच्या वरुण चौधरी(4-62), लोकेश चौधरी(3-60), सोहम कांबळे(2-24)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे क्लब ऑफ महाराष्ट्रचा डाव 74.1 षटकात सर्वबाद 216धावावर कोसळला. यात स्वप्नील 72, विशाल पारीक 51(91,6×4,2×6), अक्षित इंगळे 28, यश हळे 21 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 70 षटकात 9बाद 242धावा करून आपला डाव घोषित केला. यामध्ये सय्यद सुफयानने 202चेंडूत 11चौकाराच्या 95, सुशांत अभंग 43, अरहान सक्सेना 24, ओंकार थोरात 22, साईराज चोरगे 18 यांनी धावा काढून संघाला पहिल्या डावात 26 धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने दिवस अखेर 28.2 षटकात 5बाद 84धावा केल्या. यात केदार बजाज 57 , अभिषेक कापे 17 यांनी धावा केल्या. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पीवायसीने पहिल्या डावातील आघाडीवर विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
डेक्कन जिमखाना मैदान:
पहिला डाव: एमसीए अ: 62.1 षटकात सर्वबाद 309धावा(आयुष रक्ताडे 106(90,15×4,1×6), पुष्कर अहिरराव 51(56,10×4), अभिनंदन गायकवाड 50(70, 6×4,1×6), समेक जगताप 29, आर्यन गोजे 21, सचिन सपा 13, वेदांत सणस 2-38, सर्वेश सुर्वे 2-39, अश्विन भापकर 2-42, साहिल कड 2-61) वि. डेक्कन जिमखाना : 58.5 षटकात सर्वबाद 233 धावा(जाईद शेख 55(43,7×4), साहिल कड 49(32,10×4,1×6), सर्वेश सुर्वे 41(69,7×4), वेदांत सणस 25, देवराज बेद्रे 18, आफताफ शेख 4-32, साहिल मदार 2-39, समेक जगताप 2-20); एमसीए अ संघाकडे पहिल्या डावात 76धावांची आघाडी;

दुसरा डाव: एमसीए अ:57 षटकात 5बाद 296धावा(अभिनंदन गायकवाड 84(69,10×4,1×6), आयुष रक्ताडे नाबाद 69(57,8×4,1×6), पुष्कर अहिरराव 63(63,8×4,2×6), सचिन सापा 30 , समेक जगताप 23, रिद्धेश भुरूक 3-55, अश्विन भापकर 1-41) वि. डेक्कन जिमखाना : ; सामना अनिर्णित; एमसीए अ संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी;

डिझायर स्पोर्ट्स कॉर्पोरेशन मैदान:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 74.1 षटकात सर्वबाद 216धावा(स्वप्नील 72(93,5×4,2×6), विशाल पारीक 51(91,6×4,2×6), अक्षित इंगळे 28, यश हळे 21, वरुण चौधरी 4-62, लोकेश चौधरी 3-60, सोहम कांबळे 2-24) वि. पीवायसी हिंदू जिमखाना: 70 षटकात 9बाद 242धावा(डाव घोषित) (सय्यद सुफयान 95(202,11×4), सुशांत अभंग 43(35,7×4), अरहान सक्सेना 24, ओंकार थोरात 22, साईराज चोरगे 18, यश हाळे 4-65, यश भंडारी 2-33); पीवायसीने पहिल्या डावात 26 धावांची आघाडी घेतली;

दुसरा डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 28.2 षटकात 5बाद 84धावा(केदार बजाज 57(71,7×4,3×6), अभिषेक कापे 17, आर्य पानसे 3-19, लोकेश चौधरी 2-11) वि.पीवायसी हिंदू जिमखाना: . सामना अनिर्णित; पीवायसीने पहिल्या डावातील आघाडीवर विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या – 
धागा खोल दिया! क्लासेन-जेन्सनने शेवटच्या 10 षटकात फोडली इंग्लिश गोलंदाजी, लुटल्या इतक्या धावा
“आपण न्यूझीलंडविरुद्ध जिंकू ना?”, गिलने थेट रोहितला केला प्रश्न, असे होते उत्तर

Related Articles