गुरूवार (दिनांक १०.०४. २०२२) स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रामध्ये पार पडलेल्या कार्यकारणी सभेत महाराष्ट्र केसरी २०२२ स्पर्धेचे पुढील स्पर्धेचे नियोजन करण्यात आले .
६४वी वरिष्ठ गट गादी माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी ‘ स्पर्धा श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे ४ एप्रिल ते ९ एप्रिल २०२२ यादरम्यान खेळली जाईल.
तसेच, जुनियर व सब जुनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल भोसरी , पिंपरी चिंचवड येथे १८ मार्च ते २० मार्च या काळात होईल.
कार्यकारणी सभेस कार्याध्यक्ष श्री नामदेवराव मोहिते , उपाध्यक्ष श्री सर्जेराव शिंदे , उपाध्यक्ष श्री गणेश कोहळे उपाध्यक्ष श्री हनुमंत गावडे , उपाध्यक्ष श्री संभाजी वरूटे उपाध्यक्ष श्री दयानंद भक्त सरचिटणीस प्रा . बाळासाहेब लांडगे , खजिनदार श्री सुरेश पाटिल , तांत्रिक सचिव श्री बंकट यादव , विभागीय सचिव श्री सुनील चौधरी , श्री वामनराव गाते , श्री भरत मेकाले , श्री मुर्लीधर टेकुलवार , श्री संपत साळुंखे , श्री शिवाजी धुमाळ , श्री सुभाष घासे , श्री सुभाष ढोणे , श्री विनायक गाढवे हे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी याबाबतची माहिती दिली.