एमपीएल 2025 मध्ये यंदा प्रथमच सातारा वॉरियर्स (Satara Warriors) संघ सहभागी होत आहे. छत्रपती संभाजी किंग्स हा संघ निष्कासित झाल्यानंतर, सातारा वॉरियर्स त्यांचे जागा घेतील. अनेक बड्या खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाच्या कर्णधार व उपकर्णधारांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली.
सातारा वॉरियर्स संघाचा पहिला कर्णधार होण्याचा मान यष्टीरक्षक सौरभ नवले (Saurabh Nawale) याला मिळाला आहे. सौरभ याने यापूर्वी छत्रपती संभाजी किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सौरभ महाराष्ट्रासाठी रणजी व विजय हजारे ट्रॉफी मध्ये देते खेळलेला आहे. तर, अनुभवी सलामीवीर पवन शहा (Pavan Shah) हा संघाचा उपकर्णधार असेल. पवन याने एमपीएलच्या पहिल्या दोन हंगामात पुणेरी बाप्पा संघातकडून आपले कौशल्य दाखवले होते. यानंतर, लिलावात त्याला सातारा संघाने आपल्याकडे ओढले.
सातारा वॉरियर्स संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला दिसून येतो. भारताच्या अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य व आयपीएलचा अनुभव असलेला राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangrgekar) याच संघाचा भाग असेल. याव्यतिरिक्त ओम भोसले, मेहुल पटेल व हर्षल काटे यांच्यासारखे फलंदाज संघासाठी उपयुक्त ठरतील. सनी पंडित, विवेक शेलार आणि शुभम मैद यांच्यावर गोलंदाजीची भिंत असेल. सातारा स्पर्धेतील आपला पहिला सामना 5 जून रोजी रायगड रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.
एमपीएल 2025 साठी सातारा वॉरियर्सचा संघ- राजवर्धन हंगरगेकर (कर्णधार) हर्षल काटे, ओम भोसले, साैरभ नवले, मेहुल पटेल, शमसुझमा काझी, अनिकेत पोरवाल, पवन शहा, जगदिश जोपे, सन्नी पंडित, तेजस तोलसंकर, साैरभ शेवाळकर, साैरभ सिंग, विवेक शेलार, इंद्रजित शिंदे, अथर्व शेळके, शुबम मैद, वैभन दरकुंडे, अतिश कुंभार, स्वराज चव्हाण, वैभव चाैगुले, अनिरुद्ध साबळे, महेश मस्के, अर्जुन वाघ व देव नवले.
या स्पर्धेतील सामने Sports 2 या टीव्ही वाहिनीवर आणि JioHotstar या OTT प्लॅटफॉर्मवर थेट प्रसारित केले जाणार आहेत. ही संपूर्ण स्पर्धा गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल, अशी माहिती एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली.






