---Advertisement---

भारताविरुद्ध सौद शकीलची अर्धशतकी खेळी,पण आता या कारणाने ट्रोलर्सच्या‌ निशाण्यावर

On: शुक्रवार, मार्च 7, 2025 6:38 PM
Mohammad Rizwan Saud Shakeel
---Advertisement---

मागच्या दिवसात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ विरुद्ध पाकिस्तानी फलंदाज सौद शकीलने चांगली फलंदाजी केली. या फलंदाजाने भारतीय संघाविरुद्ध अर्धशतकी पारी खेळली. पण आता हा फलंदाज वेगळ्या विषयामुळे चर्चेत आहे. मंगळवारी प्रेसिडेंट कपमध्ये स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि पाकिस्तान टेलिव्हिजन संघ समोरासमोर होते. त्यामध्ये सौद शकील स्टेट बँक ऑफ पाकिस्तान संघात सामील होता. या फलंदाजाला पाचव्या नंबर वर फलंदाजी करण्यासाठी मैदानात यायचे होते, पण यावेळी तो झोपला होता. तो मैदानात वेळेवर खेळण्यासाठी येऊ शकला नाही,यावेळी त्याला टाईम आऊट देण्यात आले.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तान संघाचा पहिला फलंदाज बाद झाला. यानंतर सौद शकील वेळेवर पोहोचू शकला नसल्याने त्याला बाद म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर पाकिस्तान टेलिव्हिजन संघाचा कर्णधार अमाद बट्ट याने अपिल केल्यामुळे अंपायरने सौद शकीलला बाद घोषित केले. मीडिया रिपोर्टच्या अंदाजानुसार शकील ड्रेसिंग रूममध्ये झोपला होता आणि तो सामन्यादरम्यान वेळेवर खेळण्यासाठी पोहोचू शकला नाही. याप्रकारे शकील पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला ज्याला टाईम आऊट करण्यात आले. तसेच क्रिकेटच्या इतिहासातील तो सातवा फलंदाज ठरला.

आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, क्रिकेटच्या मैदानावर टाईम आऊट म्हणजे नक्की काय असते? एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला किती वेळात मैदानावर पोहोचायचे असते? क्रिकेट मैदानावर दुसऱ्या फलंदाजाला पुढच्या तीन मिनिटात खेळण्यासाठी मैदानात यायचे असते. जर एखादा फलंदाज तीन मिनिटात मैदानात येऊ शकला नाही, तर विरुद्ध संघ त्या फलंदाजाला बाद करण्यासाठी अपील करतो. यानंतर अंपायर त्या खेळाडूला बाद घोषित करतो. आता सौद शकील टाईम आऊट होऊन बाद झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चांगलीच टीका करण्यात येत आहे.

हेही वाचा

भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यादिवशी हवामान कसं असेल? जाणून घ्या संपूर्ण अंदाज

भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल कोण जिंकणार? चॅट जीपीटी म्हणतंय….

भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल कोण जिंकणार? चॅट जीपीटी म्हणतंय….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---