भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मागील काही सामन्यात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने आक्रमक खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळेच त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानींही त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
सौरव गांगुली यांनी रिषभ पंतचे कौतुक करताना एका मुलाखतीत म्हटले की, “मला भारतीय संघाला कसोटी जिंकवून देणाऱ्या सर्व खेळाडूंवर पुरेपूर विश्वास आहे, यात पंतचाही समावेश आहे. मी पंतला खूप जवळून पाहिले आहे. ज्या दिवशी त्याचा दिवस असतो त्यावेळेस तो एकटाच विरोधी संघाला पुरुन उरेल. तो संघाला एकहाती सामना जिंकू देऊ शकतो”
तसेच सौरव गांगुली पुढे म्हणाले, “मी आधीसुद्धा बोललो होतो की, पंत जर -६ षटक आणखी मैदानावर टिकला असता; तर भारतीय संघाने सिडनीमध्ये झालेला सामना देखील जिंकला असता. तो सामना बदलण्याची क्षमता राखतो आणि तो एक मॅचविनर खेळाडू आहे. माझ्यावेळी विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि युवराज सिंग हे खेळाडूदेखील अगदी अशीच भूमिका पार पाडत होते.”
पंतने चौथ्या कसोटी सामन्यात झळकावलेल्या शतकीय खेळीबद्दल बोलताना गांगुली म्हणाले, “भारतीय संघाने १४० धावांवर ६ गडी गमावले होते. तरीसुद्धा त्याने उत्कृष्ट खेळी करत सामना पालटला. अन्यथा हा सामना कुठल्याही दिशेत जाऊ शकला असता. तसेच जेम्स अँडरसनविरुध्द खेळलेली आक्रमक खेळी कौतुकास्पद होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कोरोना चाचणी करतेवेळी सचिन तेंडूलकरला ‘हे’ काय झालं, डॉक्टरही गेले घाबरुन
वृद्धिमान साहाच्या मुलाचा बड्डे जल्लोषात साजरा, ‘विरुष्का’सह भारतीय खेळाडूंची उपस्थिती; फोटो व्हायरल
पक्काचं समजा! टी२० मालिकेत भारताचा विजय जवळपास निश्चित, असं आम्ही नाही ही आकडेवारी सांगते






