जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सोमवारपासून (३ जानेवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. द वाँडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याचा गुरुवारी (६ जानेवारी) चौथा दिवस आहे. मात्र, चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच पावसाचा अडथळा आला आहे. त्यामुळे खेळ उशीरा सुरू होणार आहे. या सामन्यात अखेरच्या २ दिवसात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२२ धावांची गरज आहे. तसेच भारताला ८ विकेट्स घेण्याची गरज आहे.
Start of play on Day 4⃣ has been delayed due to rain here at the Wanderers 🌧️🌧️#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/ea2GMhNfnp
— BCCI (@BCCI) January 6, 2022
या सामन्यात भारताने पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २२९ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर संपुष्टात आल्याने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाखेर ४० षटकात २ बाद ११८ धावा केल्या होत्या.