केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारपासून (११ जानेवारी) सुरू झाला आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे होत असलेल्या या कसोटीचा बुधवारी दुसरा दिवस आहे. या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत भारतीय संघाने यजमानांना २१० धावांवर गुंडाळले आहे. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ७० धावांची आघाडी घेतली आहे.
भारताला दुसऱ्या डावात सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. भारताचे सलामीवीर मयंक अगरवाल आणि केएल राहुल केवळ २४ धावांवर तंबूत परतले आहेत. सुरुवातीला कागिसो रबाडाने संघाची धावसंख्या २० असताना अगरवालला डीन एल्गारच्या हातून झेलबाद केले. अगरवाल वैयक्तिक ७ धावांवर पव्हेलियनला परतला. त्यानंतर ५.५ षटकात राहुलही मार्को जेन्सनचा शिकार ठरला.
भारताची सलामी जोडी बाद झाल्यानंतर संघ २ बाद २४ अशा अशा स्थितीत आहे. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली फलंदाजीला आले आणि त्यांनी एका बाजूने संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी बचावात्मक फलंदाजी केली. परिणामी दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ २ बाद ५७ धावा अशा स्थितीत आहे. पुजारा नाबाद ९ आणि कोहली नाबाद १४ धावांवर खेळतो आहे.
STUMPS on Day 2 of the 3rd Test.#TeamIndia 223 & 57/2, lead South Africa (210) by 70 runs.
Scorecard – https://t.co/yUd0D0Z6qF #SAvIND pic.twitter.com/WX4MlYHoU9
— BCCI (@BCCI) January 12, 2022
भारताची नाममात्र १३ धावांची आघाडी
या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत भारतीय संघाने यजमानांना २१० धावांवर गुंडाळले आहे. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात नाममात्र १३ धावांची आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रापर्यंत पाहुण्या भारताच्या गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत धाडला. जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांनी लंच ब्रेकपर्यंत भारताला ३ मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विकेट्स घेण्याची जबाबदारी अनुभवी मोहम्मद शमीने आपल्या खांद्यावर घेतली.
शमीने डावातील ५६ वे षटक टाकताना दुसऱ्या चेंडूवर टेम्बा बावुमाची विकेट घेतली. २८ धावांवर खेळत असलेल्या बावुमाला त्याने कर्णधार विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले. कोहलीने सेकंड स्लिपमध्ये अप्रतिम डाईव्ह मारत बावुमाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पुढे याच षटकातील चौथ्या चेंडूवर यष्टीपाठी असलेल्या रिषभ पंतने नुकताच फलंदाजीला आलेल्या कायल व्हेरिनला शून्यावर झेलबाद केले.
शमीने एकाच षटकात घेतलेल्या २ विकेट्सनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ ६ बाद १५९ धावा अशा स्थितीत होता. पुढे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मार्को जेन्सनला ७ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २०० असताना शार्दुल ठाकूरने कागिसो रबाडाला १५ धावांवर झेलबाद करत त्याचे सामन्यातील विकेट्सचे खाते उघडले. तसेच पुढे जसप्रीत बुमराहने लुंगी एन्गिडीला झेलबाद करत डावाची अखेरही केली आणि आपले विकेट्सचे पंचकही पूर्ण केले.
भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले.
A five-wicket haul for Jasprit Bumrah and South Africa's innings is wrapped up for 210 👏🏻
India lead by a slender 13 runs.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/cmqKWckoIX
— ICC (@ICC) January 12, 2022
Shami snares Temba Bavuma and Kyle Verreynne in the same over 🔥
South Africa are reduced to 159/6, still trailing by 64.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/EghiBvjIbe
— ICC (@ICC) January 12, 2022
तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावातील ९ व्या षटकापासून आणि १ बाद १७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पहिल्या दिवसाखेर नाबाद असलेल्या एडेन मार्करम आणि केशव महाराज या दोघांनीच दुसऱ्या दिवशी डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवशीचा दुसराच चेंडू खेळताना मार्करम २२ चेंडूत ८ धावा करून त्रिफळाचीत झाला. त्याच्यानंतर केशव महाराजच्या साथीला किगन पीटरसन आला.
या दोघांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसाखेर नाईट वॉचमन म्हणून आलेल्या केशव महाराजने ४५ चेंडू खेळत चांगली झुंज दिली. पण, त्याची ही झुंज उमेश यादवने २१ व्या षटकात संपवली. महाराजने २५ धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र, किगन पीटरसन आणि रस्सी वॅन डर ड्यूसेन यांनी अर्धशतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सांभाळत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राखेरपर्यंत १०० धावसंख्येचा आकडा गाठून दिला.
पहिल्या सत्राचा खेळ थांबला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे ३५ षटकात ३ बाद १०० धावा झाल्या होत्या. त्यांच्याकडून पीटरसन ४० धावांवर आणि ड्यूसेन १७ धावांवर नाबाद होता.
South Africa go to lunch at 100/3 with the partnership between Keegan Petersen and Rassie van der Dussen reviving them 👌🏻
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/ifhJ1X87uU
— ICC (@ICC) January 12, 2022
तत्पूर्वी भारतीय संघाचा पहिला डाव २२३ धावांवर पहिल्याच दिवशी संपुष्टात आला होता.