फलंदाजांची जोरदार फटकेबाजी, गोलंदाजांनी उडवलेल्या दांड्या आणि क्षेत्ररक्षकांचे अप्रतिम झेल या गोष्टी कोणत्याही क्रिकेट सामन्याचा रोमांच वाढवतात. त्यातही क्षेत्ररक्षक फलंदाजाचा झेल सुटू नये म्हणून स्वत:ला झोकून देताना दिसतात. असेच काहीसे दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी (०२ एप्रिल) झालेल्या पहिल्या वनडेत सामन्यात पाहायला मिळाले. पाकिस्तानी क्रिकेटपटू फहीम अशरफने दक्षिण आफ्रिकाचा फलंदाज ऍडेन मार्करम याचा लाजबाव झेल टिपला.
तर झाले असे की, पाकिस्तानचा फलंदाज शाहिन शाह आफ्रिकी डावातील सातवे षटक टाकत होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर फलंदाज मार्करमने मिड ऑनच्या दिशेने साधारण शॉट मारला. मिड ऑनवर आधीपासूनच अशरफ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. मात्र आपला चेंडू त्याच्यापर्यंत जाण्याआधीच मैदानावर टप्पा घेईल, असे मार्करम वाटले.
परंतु अशरफने वेगाने पुढे धावत येत मोठी झेप घेतली आणि दोन्ही हातांनी जबरदस्त झेल घेतला. त्याचा झेल पाहून स्वत: मार्करमलाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही की, आपण झेलबाद झालो आहेत. तो थक्क नजरेने अशरफकडे पाहत राहिला.
अशाप्रकारे अशरफच्या चमकदार क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानला मोठे यश मिळाले. २३ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १९ धावा करत मार्करम पव्हेलियनला परतला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/_Bilalzafar/status/1377904376551862273?s=20
सामन्याचा विचार करायचा झाल्यास, दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २७३ धावा केल्या होत्या. यात रसी वान डर सेन याच्या नाबाद १२३ धावांचे मोठे योगदान राहिले. याबरोबरच डेविड मिलरनेही अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन शाह आफ्रिदी आणि हसीर रौफ यांनी प्रत्येकी २ विकेट्स चटाकवल्या.
दक्षिण आफ्रिकाच्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शतक केले. तर सलामीवीर इमाम-उल-हकने ७० धावा आणि मोहम्मद रिझवानने ४० धावा केल्या. त्यामुळे ७ विकेट्स गमावत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकाचे लक्ष्य सहज पूर्ण केले आणि सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकरला हॉस्पिटलमध्ये दाखल करताच माजी पाकिस्तानी खेळाडूकडून आला ‘हा’ खास संदेश
हिटमॅनचा कारनामा! आयपीएलमधील ‘हे’ दोन भन्नाट विक्रम करणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू