---Advertisement---

एशियन गेम्स सिल्वर मेडलिस्ट सायली केरीपाळे कडे महाराष्ट्र महिला संघाचे नेतृत्व.

On: गुरूवार, जुलै 4, 2019 4:48 PM
---Advertisement---

पुणे- राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघाची मंगळवारी घोषणा झाली आहे. मागील वर्षी जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या महाराष्ट्राच्या सायली केरिपाळे हिची ६६ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद कबड्डी – महिला स्पर्धा साठी महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

सायली केरिपाळे राज्य स्तरीय स्पर्धेत पुणे जिल्हाचे प्रतिनिधित्व करते. तर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दोन वेळा कांस्य पदक पटकावले आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर मागील वर्षी सायलीची भारतीय संघात निवड झाली होती. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत रोप्यपदक पटकावले आहे. तसेच विद्यापीठ पातळीवर हि अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत रोप्यपदक पटकावले आहे.

कबड्डीतील या उल्लेखनीय कामगिरी बद्दल तिला महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याची संधी सायलीला मिळाली आहे. गेल्या चार दशकापासून महाराष्ट्र महिला संघ विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. सायली केरिपाळेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करून महाराष्ट्र संघाला विजेतेपद पटकावून देतील अशी आशा आहे.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद कबड्डी – महिला स्पर्धा पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉप्म्प्लेक्स ,पटना येथे होणार आहे. दिनांक ११ जुलै ते १४ जुलै २०१९ या कालावधीत हि स्पर्धा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment