पुणे | आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत अॅमडॉक्स् संघाने यार्डी संघाचा तर सायबेज संघाने टिएटो संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात आवेश सय्यदच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर अॅमडॉक्स् संघाने यार्डी संघाचा 55 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना 6 चौकार व 9 षटकांरासह केवळ 57 चेंडूत आवेश सय्यदने नाबाद 103 धावा केल्या. आवेशच्या शतकी खेळीसह अॅमडॉक्स् संघाने 20 षटकात 6 बाद 183 धावा केल्या. 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भावनीश कोहली व प्रविण खालखोच्या अचूक गोलंदाजीपुढे यार्डी संघ18.2 षटकात सर्वबाद 128 धावांत गारद झाला. 57 चेंडूत 103 धावा करणाराआवेश सय्यद सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत संकेत ऐकलच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर सायबेज संघाने टिएटो संघाचा 10 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रतिक पंडीतच्या 41, संकेत ऐकलच्या 61 व राकेश शिंदेच्या नाबाद 21 धावांसह सायबेज संघाने 20 षटकात 6 बाद 140 धावा केल्या. 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निखिल गेरासे व सौरभ रावळ यांच्या आक्रमक गोलंदाजीने टिएटो संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 130 धावांत रोखला. संकेत ऐकल सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
अॅमडॉक्स् – 20 षटकात 6 बाद 183 धावा(आवेश सय्यद नाबाद 103(57), अंकित खरे 21(14), अविरल जौन 23(16), प्रभुल पी.के 3-27, प्रमोद दवंडे 2-28) वि.वि यार्डी- 18.2 षटकात सर्वबाद 128 धावा(स्वप्निल घाटगे 33, गौतम तुळपुळे 25(15), पंकज लालगुडे 40(23), भावनीश कोहली 3-21, प्रविण खालखो 3-22) सामनावीर- आवेश सय्यद
अॅमडॉक्स् संघाने 55 धावांनी सामना जिंकला.
सायबेज- 20 षटकात 6 बाद 140 धावा(प्रतिक पंडीत 41(39), संकेत ऐकल 61(41), राकेश शिंदे नाबाद 21(16), पुष्पेंद्र सिंग 3-25, उमेश तोमर 3-15) वि.वि टिएटो- 20 षटकात 8 बाद 130 धावा(विक्रम माळी 32(32), चेतन पिंगळे 43(28), उमेश तोमर 29(19), निखिल गेरासे 3-21, सौरभ रावळ 2-13) सामनावीर- संकेत ऐकल
सायबेज संघाने 10 धावांनी सामना जिंकला.