पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सबज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत वेदांत नातू, सुदीप खोराटे, साईराज नायसे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या पाचव्या फेरीत प्रवेश केला.
पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील चौथ्या फेरीत पुण्याच्या वेदांत नातूने आपलाच सहकारी निक्षेप कात्रेला १५-९, १५-८ असे पराभूत केले. यानंतर वेदांतची आता साईराज विरुद्ध लढत होणार आहे. नागपूरच्या साईराजने नाशिकच्या सोहम हिंगणेला १५-७, ११-१५, १५-११ असे पराभूत केले. पुण्याच्या सुदीप खोराटेने अजिंक्य कुलकर्णीला १५-११, १५-८ असे नमविले.
कृष्णा, सिया यांची आगेकूच
स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या चौथ्या फेरीत नागपूरच्या कृष्णा सोनीने शार्दूली माळीवर १५-२, १५-८ असा, तर नाशिकच्या सिया वायदंडेने पुण्याच्या आर्या कुलकर्णीवर १२-१५, १५-१३, १५-११ असा विजय मिळवला.
निकाल : १५ वर्षांखालील मुली – तन्वी घारपुरे वि. वि. खुशी पहावा १५-४, १५-६, शौर्या माधवी वि. वि. मनस्वी चौहान १५-७, १५-१०, दक्षायनी पाटील वि. वि. मानसीता मोहापात्रा १५-६, १५-१०, रिद्धीमा सरपाटे आर्या मेस्त्री १५-७, १५-५, अनन्या शिंदे वि. वि. श्रावणी अरडे १५-७, १५-५.
(SBA Cup Sub-Junior Badminton Tournament. Progress of Vedanta, Sudeep, Sairaj)
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! आशियाई क्रीडा स्पर्धांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, लगेच वाचा
विकेट नंबर 17! भेदक गोलंदाजी करत ब्रॉडने पुन्हा ठेचल्या वॉर्नरच्या नांग्या