वनडे विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी (7 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन संघाने ग्लेन मॅक्सवेल याच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर हा सामना तीन विकेट्स राखून जिंकला. सोबतच या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. ते दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी खेळतील. मात्र, दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध कोण खेळणार हे लवकरच निश्चित होईल.
भारतीय संघाने सलग आठ विजयांसह पहिल्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाशी लढतील. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका आता भारताची बरोबरी करण्याची शक्यता नसल्याने दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहतील. त्यामुळे याच दोन्ही संघांमध्ये दुसरा उपांत्य सामना रंगेल.
उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी सध्या न्यूझीलंड, पाकिस्तान व अफगाणिस्तान संघर्ष करत आहेत. या सर्व संघांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. अफगाणिस्तान आपला अखेरचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तर न्यूझीलंड स्पर्धेतून यापूर्वीच बाहेर झालेल्या श्रीलंकेविरुद्ध खेळेल. तर पाकिस्तानला आपला शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे.
या सर्व संघांमध्ये न्यूझीलंड संघाचा रनरेट सर्वाधिक असल्याने केवळ विजय मिळवूनच ते उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकतात. पाकिस्तानला आपली धावगती न्यूझीलंडच्या पुढे न्यायची असल्यास त्यांना इंग्लंडविरुद्ध 130 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवावा लागेल. तर अफगाणिस्तान संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून, श्रीलंका व पाकिस्तान पराभूत झाल्यास उपांत्य फेरीत दाखल होईल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात पावसाची शक्यता असल्याने, हा सामना पूर्ण न झाल्यास न्यूझीलंड संघाला नुकसान सोसावे लागू शकते. त्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडला एका धावेने पराभूत केले तरी ते उपांत्य फेरीत पोहोचतील. भारत पाकिस्तान हे उपांत्य फेरीत समोरासमोर आल्यास हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळला जाईल. 15 नोव्हेंबर रोजी हा सामना होईल.
(Scenario For India v Pakistan Semi Final In 2023 ODI World Cup)
हेही वाचा-
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’
ODI Rankings: 24 वर्षीय शुबमन बनला जगातील नंबर 1 फलंदाज, बाबरची बादशाहत संपुष्टात