भारतीय संघ पुढीलवर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. आज(7 जून) न्यूझीलंडने त्यांचे 2019-20 या मोसमातील वेळापत्रक जाहिर केले आहे. यामध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचाही समावेश आहे. येत्या मोसमात भारताबरोबर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौरा करणार आहे.
भारतीय संघ या न्यूझीलंड दौऱ्यात 5 टी20 सामने, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. भारताच्या या दौऱ्याची सुरुवात 24 जानेवारीला टी20 मालिकेने होणार आहे. तर दौऱ्याचा शेवट कसोटी मालिकेने होईल.
भारताच्या आधी इंग्लंड नोव्हेंबर 2019 मध्ये न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध 5 टी20 आणि 2 कसोटी सामने खेळेल. त्यानंतर न्यूझीलंड डिसेंबर 2019 मध्ये 3 कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. यानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा होईल.
त्याचबरोबर न्यूझीलंडने जाहिर केलेल्या 2019-20 या मोसमातील सर्व कसोटी मालिका या टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असतील.
असा असेल भारताचा न्यूझीलंड दौरा – जानेवारी-मार्च 2020
टी20 मालिका –
24 जानेवारी – पहिला टी20 सामना – इडन पार्क, ऑकलंड
26 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इडन पार्क, ऑकलंड
29 जानेवारी – तिसरा टी20 सामना – सेडन पार्क, हॅमिल्टन
31 जानेवारी – चौथा टी20 सामना – वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन
2 फेब्रुवारी – पाचवा टी20 सामना – बे ओव्हल, तौरंगा
वनडे मालिका –
5 फेब्रुवारी – पहिला वनडे – सेडन पार्क, हॅमिल्टन
8 फेब्रुवारी – दुसरा वनडे – इडन पार्क, ऑकलंड
11 फेब्रुवारी – तिसरा वनडे – बे ओव्हल, तौरंगा
कसोटी मालिका –
21 – 25 फेब्रुवारी – पहिली कसोटी – बासिन रिसर्व, वेलिंग्टन
29 – 4 मार्च फेब्रुवारी – दुसरी कसोटी – हॅगली ओव्हल, ख्रिस्टचर्च
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाचे २०१९-२० मधील घरच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईमध्ये होणार हे सामने
–विश्वचषक २०१९: अफगाणिस्तानचा हा महत्त्वाचा खेळाडू विश्वचषकातून बाहेर, जाणून घ्या कारण
–विश्वचषक २०१९: १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत मिशेल स्टार्कने रचला नवा विश्वविक्रम
–एमएस धोनीला ही गोष्ट पुन्हा करता येणार नाही, आयसीसीची बीसीसीआयला ताकिद






