नुकताच यूएई आणि ओमान येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारत पहिले-वहिले जेतेपद पटकावले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता आयसीसीने आणखी एका मोठ्या स्पर्धेची घोषणा केली आहे. ज्याचा प्रारंभ जानेवारी महिन्यात होणार आहे.
येत्या जानेवारी महिन्यात आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. तसेच या स्पर्धेत १६ संघ सहभाग घेणार असून एकूण ४८ सामने खेळले जाणार आहेत. आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या १४ व्या पर्वाचे यजमानपद पहिल्यांदाच वेस्ट इंडिजला देण्यात आले आहे.
तसेच या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, तर २०२० मध्ये भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. भारतीय संघ सध्या ग्रुप ‘बी’मध्ये आहे. ज्यामध्ये आयर्लंड, युगांडा, दक्षिण आफ्रिका हे संघही आहेत. तर २०२० मध्ये जेतेपद मिळवणारा बांगलादेश संघ ग्रूप ‘ए’मध्ये आहे. या ग्रुपमध्ये इंग्लंड, कॅनडा, यूएई हे इतर ३ संघ आहेत.
याशिवाय ग्रुप ‘सी’ मध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे संघ आहेत, तर ग्रुप ‘डी’मध्ये ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. या स्पर्धेतून न्यूझीलंडने माघार घेतल्याने स्कॉटलंडला संधी मिळाली आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १६ संघांमध्ये साखळी फेरी संपल्यानंतर सुपर लीग आणि प्लेट सामने अशा फेरींमध्ये संघांचे विभाजन होईल. सुपर लीगमधून विजयी होणारा संघ विश्वचषक उंचावेल.
हे सामने कॅरेबियन बेटांवर पार पडणार असून चार देशातील १० स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये अँटिग्वा आणि बारबुडा, गयाना, सेंट किट्स आणि नेव्हिस आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांचा समावेश आहे. उपांत्य सामने आणि अंतिम सामना सर विवियन रिचर्ड्स ग्राउंड, अँटिग्वा आणि बारबुडा येथे होणार आहेत.
असे आहेत दोन्ही ग्रूप
अ गट: बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा आणि यूएई
ब गट: भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा
क गट: अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे
ड गट: ऑस्ट्रेलिया, स्कॉटलॅंड श्रीलंका आणि वेस्ट इंडिज
या ठिकाणी पार पडणार सामने –
सेंट किट्स आणि नेव्हिस: वॉर्नर पार्क, कोनारी
गयाना: गयाना नॅशनल स्टेडियम
त्रिनिदाद आणि टोबॅगो: ब्रायन लारा क्रिकेट मैदान, क्वीन्स पार्क ओव्हल, दिएगो मार्टिन
अँटिग्वा आणि बारबुडा: सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राउंड, कूलिज क्रिकेट ग्राउंड
भारतीय संघाचे वेळापत्रक (साखळी फेरी) –
१५ जानेवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, गयाना
१९ जानेवारी – भारत विरुद्ध आयर्लंड, ब्रायन लारा क्रिकेट मैदान
२२ जानेवारी – भारत विरुद्ध युगांडा, ब्रायन लारा क्रिकेट मैदान
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचीन रविंद्रच्या नावामागे ‘हे’ रहस्य; भारतीय क्रिकेटशी जोडलाय संबंध
भारताची एक नंबर जोडी! रोहित-राहुलने ५० धावांच्या भागीदारीसह ‘या’ विक्रमात मिळवला पहिला क्रमांक
तब्बल ८८ खेळाडू घेणार जोखीम! दिल्लीत विषारी हवेत खेळणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची उपांत्यपूर्व फेरी