आयपीएल 2024चा हंगाम रविवारी संपला व कोलकाता नाईट रायडर्सने शानदार विजय मिळवत तिसऱ्यांदा विजयाला गवसणी घातली. त्यानंतर आता देशांतर्गत क्रिकेटमधील लोकप्रिय महाराष्ट्र प्रीमीयर लीग (Maharashtra Premier League 2024 Timetable) अर्थात एमपीएल 2024ला 2 जूनपासून सुरुवात होत आहे.
कुठे होणार सामने?
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनने एमपीएलचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन केले आहे. या स्पर्धेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत. 2 जून रोजी गतविजेत्या रत्नागिरी जेट्स विरुद्ध गतउपविजेत्या कोल्हापूर टस्कर्स संघातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेची फायनल 22 जून रोजी गहुंजे इथेच होणार आहे.
किती सामने खेळवले जाणार?
स्पर्धेत एकूण 34 सामने खेळवले जाणार असून दुहेरी राउंड रॉबीन पद्धतीने ते होणार आहे. याचाच अर्थ साखळी फेरीत प्रत्येक संघ दुसऱ्या संघासोबत दोनदा सामने खेळणार आहेत. स्पर्धेत एकूण 6 संघ आहेत. साखळी फेरीत एकूण 30 सामने होणार असून प्ले-ऑफचे सामने आयपीएच्या धर्तीवरच होणार आहेत.
कसे असतील प्ले-ऑफचे सामने?
प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये क्वॉलीफायर 1, एलिमीनेटर, क्वॉलीफायर 2 व फायनल असे 4 सामने होतील. साखळी फेरीत अव्वल स्थानी राहिलेल्या पहिल्या दोन संघांना क्वॉलीफायर 1 व 2चे सामने खेळायला मिळतील. क्वॉलीफायर 1 19 जून रोजी. एलिमीनेटर 20 जून रोजी, क्वॉलीफायर 2 21 जून रोजी तर फायनल 22 जून रोजी होईल.
कोणते मुख्य खेळाडू दिसणार स्पर्धेत?
भारताचा दिग्गज अष्टपैलू केदार जाधव, प्रतिभावान क्रिकेटर रुतुराज गायकवाड, अर्शिन कुलकर्णीसारखे दिग्गज खेळाडू स्पर्धेत खेळताना दिसतील.
स्पर्धेत कोणते संघ सहभागी होतायेत?
स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होत असून त्यांना शहरांची किंवा किल्ल्यांची नावे देण्यात आली आहे. त्यात पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, सोलापूर रॉयल्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स या संघांचा समावेश आहे.
एमपीएल 2024चे वेळापत्रक:
2 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, सायंकाळी 7 वा
3 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध पुणेरी बाप्पा, दुपारी 2 वा
3 जून- रायगड रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, सायंकाळी 7 वा
4 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स, दुपारी 2 वा
4 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध पुणेरी बाप्पा, सायंकाळी 7 व
5 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, दुपारी 2 वा
5 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, सायंकाळी 7 वा
6 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध रायगड रॉयल्स, दुपारी 2 वा
6 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, सायंकाळी 7 वा
7 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रायगड रॉयल्स, दुपारी 2 वा
7 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा, सायंकाळी 7 वा
8 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, दुपारी 2 वा
8 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, सायंकाळी 7 वा
9 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, दुपारी 2 वा
9 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रायगड रॉयल्स, सायंकाळी 7 वा
10 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, सायंकाळी 7 वा
11जून- रायगड रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, दुपारी 2 वा
11जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध पुणेरी बाप्पा, सायंकाळी 7 वा
12 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध पुणेरी बाप्पा, दुपारी 2 वा
12 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स, सायंकाळी 7 वा
13 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, दुपारी 2 वा
13 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, सायंकाळी 7 वा
14 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, दुपारी 2 वा
14 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रायगड रॉयल्स, सायंकाळी 7 वा
15 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध रायगड रॉयल्स, सायंकाळी 7 वा
16 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, दुपारी 2 वा
16 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, सायंकाळी 7 वा
17 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रायगड रॉयल्स, दुपारी 2 वा
17 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज, सायंकाळी 7 वा
18 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा, सायंकाळी 7 वा
19 जून- क्वालिफायर 1, सायंकाळी 7 वा
20 जून- एलिमिनेटर, सायंकाळी 7 वा
21 जून- क्वालिफायर 2, सायंकाळी 7 वा
22 जून- अंतिम सामना, सायंकाळी 7 वा
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीआयला प्रशिक्षकासाठी गौतम गंभीरशिवाय दुसरा पर्याय नाही, जाणून घ्या बातमीद्वारे
ही “ऑरेंज कॅप” तुम्हाला आयपीएल ट्राॅफी जिंकून देत नाही अंबाती रायडूचे परखड वक्तव्य